तरुण भारत

पंतप्रधान मोदी-बायडन चर्चा 24 सप्टेंबरला

संयुक्त राष्ट्रसंघ सर्वसाधारण सभेत उपस्थित राहणार- कोरोना काळातील प्रथमच दौरा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांच्यातील प्रथम प्रत्यक्ष चर्चा 24 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये होणार आहे. त्यांचे बुधवारी सकाळी अमेरिकेकडे प्रयाण होणार असून बुधवारी रात्री उशीरा ते वॉशिंग्टन डीसी येथे पोहचतील. त्यांचा कोरोना काळातील हा प्रथमच विदेश दौरा असून त्यात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत, अशी माहिती देण्यात आली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भाग घेण्यासाठी पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱयावर जात आहेत. मात्र, यानिमित्ताने त्यांची अनेक जागतिक नेत्यांशी समोरासमोर भेट होणार आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती, कोरोना उद्रेक, द्विपक्षीय संबंध, जागतिक व्यापार, दहशतवाद इत्यादी अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर ते विविध राष्ट्रप्रमुखांशी चर्चा करणार आहेत. 

बायडन यांच्याशी भेट

अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांच्याशी त्यांची भेट 24 सप्टेंबरला अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असणाऱया व्हाईट हाऊस येथे होईल. अफगाणिस्तानातील परिस्थिती, वाढत चाललेला कट्टर धर्मवाद, भारत-अमेरिका संरक्षण आणि धोरणात्मक संबंध, दहशतवाद निर्मूलन, गुंतवणूक आणि व्यापार इत्यादी अनेक संवेदनशील मुद्दय़ांचा परामर्ष चर्चेत घेतला जाणार आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातील बळकट आणि बहुपयोगी संबंधांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. तसेच दोन्ही देशांमधील संबंध भविष्यकाळात अधिक दृढ कसे होतील यावरही चर्चा होईल, अशी माहिती भारताच्या विदेश व्यवहार विभागाचे मुख्य सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी दिली आहे.

क्वाडचीही बैठक होणार

24 सप्टेंबरनंतर भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान या चार देशांच्या क्वाड परिषदेची बैठक होणार आहे. ही बैठकही व्हाईट हाऊस येथेच होईल. या बैठकीत पंतप्रधान मोदी भाषण करणार आहेत. क्वाडच्या बैठकीत चीनचा वाढता विस्तारवाद आणि प्रशांत भारतीय क्षेत्रातील सुरक्षा आणि शांतता यांचा उहापोह केला जाणार आहे, असे प्रतिपादन श्रींगला यांनी केले.

संयुक्त राष्टसंघ परिषद

25 सप्टेंबरला न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होईल. या सभेत पंतप्रधान मोदी भारताचे प्रतिनिधित्व करतील. तसेच त्यांचे भाषणही होईल. ही संयुक्त राष्टसंघाची 76 वी वार्षिक परिषद असेल. या परिषदेतही अफगाणिस्तान आणि जागतिक तापमानवाढ यांच्यावर भर दिला जाणार आहे.

महत्त्वाचा दौरा

ड बायडन अध्यक्ष झाल्यापासून पंतप्रधान मोदींचा प्रथम अमेरिका दौरा

ड दहशतवाद आणि धार्मिक कट्टरता हेच या दौऱयातील प्रमुख विषय

ड अमेरिकेच्या अध्यक्षांशी व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय संबधांवर चर्चा

ड 25 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेसमोर भाषण

Related Stories

कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा नाही

Rohan_P

रेपो रेट जैसे थे!

datta jadhav

हिमाचल प्रदेशच्या भाजप अध्यक्षपदी सुरेश कश्यप

Rohan_P

सौदीकडून 80 टन ऑक्सिजन येणार

Patil_p

सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर ‘या’ कारणामुळे कोसळले

Sumit Tambekar

योगी सरकारचा मोठा निर्णय; महापुरुषांच्या जयंती आणि महाशिवरात्रीला मांस विक्रीवर बंदी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!