तरुण भारत

राजा ऋत्विक भारताचा 70 वा ग्रॅण्ड मास्टर

वृत्तसंस्था/ चेन्नई

भारताचा 17 वर्षीय युवा बुद्धिबळपटू राजा ऋत्विकने ग्रॅण्डमास्टर किताब पटकाविला आहे. बुद्धिबळ क्षेत्रामध्ये ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणारा राजा ऋत्विक हा भारताचा 70 वा बुद्धिबळपटू आहे. भारताचा माजी विश्वविजेता ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदने राजा ऋत्विकचे अभिनंदन केले आहे.

Advertisements

वारंगलचा रहिवासी राजा ऋत्विकने 2019 साली पहिला ग्रॅण्डमास्टर नॉर्म मिळविला. त्यानंतरा दुसरा आणि तिसरा ग्रॅण्डमास्टर नॉर्म त्याने महिनाभराच्या कालावधीत मिळविला. स्केलिका खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत राजाने दुसरा ग्रॅण्डमास्टर नॉर्म तर हंगेरीत झालेल्या ग्रॅण्डमास्टर खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याने तिसरा ग्रॅण्डमास्टार नॉर्म मिळविला. या स्पर्धेत त्याने चौथ्या फेरीअखेर 2500 यलो मार्क गाठताना फिनेकचा पराभव केला. गेल्या महिन्यात पुण्याचा हर्षित राजा 69 वा ग्रॅण्डमास्टर बनला होता.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात आठवा बळी

Abhijeet Shinde

धन असे करावे की, ते कोणाला कळू नये

Rohan_P

बंगळूरमध्ये कोरोना संक्रमणाची संख्या दुप्पट; लॉकडाऊनचा प्रश्नच नाही : मुख्यमंत्री येडियुरप्पा

Abhijeet Shinde

पाणलोट क्षेत्रात मुसळधार; 69 हजार 927 क्युसेक विसर्ग;

Patil_p

विठू माऊली महाराष्ट्र कोरोनामुक्त होऊ दे

Patil_p

राजापूरच्या सरपंचासह सर्व सदस्य अपात्र, विभागीय आयुक्तांनी केली कारवाई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!