तरुण भारत

पेट्रोल, डिझेलसह गॅसचे दर कमी करा

ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसचे निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. ही महागाई पाहता गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गॅसऐवजी आता पुन्हा चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ साऱयांवर येऊन ठेपली आहे. तेव्हा वाढवलेले दर कमी करावेत, तसेच महागाईवर नियंत्रण ठेवावे, यासह इतर मागण्यांसाठी ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेला हैराण केले आहे. वाढवलेले हे दर तातडीने कमी करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. याचबरोबर महिलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत. त्यांनाही आळा घालणे गरजेचे आहे. त्यादृष्टिने केंद्र व राज्य सरकारने पाऊल उचलावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

सरकारने विविध कंपन्या खासगी क्षेत्राकडे देण्याचा प्रयत्न केला आहे तर काही कंपन्या दिल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. या खासगी कंपन्या मनमानीपणे पैसे वसूल करत आहेत. तेव्हा तातडीने होत असलेले खासगीकरण थांबवावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

यावेळी काशिनाथ चव्हाण, मुरली चव्हाण, विवेक घाटकांबळे, अशोक बिदलेने, चेतन चव्हाण, कोंडय्या दादू, निरज बनसकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Related Stories

जिल्हय़ात 225 तर बेळगावात 42 दारू दुकाने उघडली

Patil_p

आराधना शाळेत कनकदास जयंती साजरी

Amit Kulkarni

हुबळी येथील संग्रहालयाचे लोकार्पण

Patil_p

लॉकडाऊन काळात शहराच्या प्रदूषणात 36 टक्क्मयांनी घट

Patil_p

अकरावी-बारावीचे क्लासेसही ऑनलाईन सुरू

Omkar B

उद्यमबाग येथील एफएल एक्स्पर्ट येथे रोग प्रतिकार शक्तीवर्धक गोळय़ांचे वाटप

Patil_p
error: Content is protected !!