तरुण भारत

भूमिगत कचराकुंडय़ासाठी 41 लाखाच्या निविदा

15 कचराकुंडय़ांकरिता निविदा मागविल्या

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असल्याने रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्मार्ट बसथांबे, स्मार्ट पथदीप, दुभाजक आणि रस्त्याशेजारी फुटपाथ निर्माण करण्यात आले आहेत. महानगरपालिकेने अत्याधुनिक पद्धतीच्या भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी पंधरा ठिकाणी अत्याधुनिक कचराकुंडय़ा बसविण्यात येणार असून याकरिता 41 लाखाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर एक डस्टबिन आणि कॉम्पॅक्टर घेण्यात येणार आहे. याकरिता महानगरपालिकेने निविदा मागविली असून जागा निश्चित करण्यात येणार आहे. स्मार्ट कचराकुंडय़ा फुटपाथ किंवा खुल्या जागेच्या ठिकाणी ठेवता येणे शक्मय आहे. भूमिगत बसविण्यात येणाऱया एका कुंडीसाठी 3 लाख रुपये खर्च येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर एका ठिकाणी भूमिगत कचराकुंडी बसविण्याचा प्रस्ताव आहे. सध्या एक कचराकुंडी आणि कॉम्पॅक्टरकरिता निविदा काढण्यात आली आहे. ही अत्याधुनिक भूमिगत कचराकुंडी प्रायोगिक तत्त्वावर टिळकवाडी परिसरात बसविण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध भागात अशा 25 कचराकुंडय़ा महापालिका बसविणार असून यापैकी 15 कचराकुंडय़ांकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. याकरिता 41 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक ठिकाणी भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्यात येणार आहेत.

फुटपाथच्या ठिकाणी जमिनीच्या खाली टाकी बांधून त्यामध्ये कचराकुंडय़ा ठेवण्यात येणार आहेत. त्यावर झाकण येणार असून, त्यावर केवळ कचरा टाकण्यासाठी लहान आकाराची पेटी असणार आहे. पाहणाऱयांना कचराकुंडी आहे असे अजिबात वाटणार नाही. अशा पद्धतीची कचराकुंडी महापालिका बसविणार आहे. कचराकुंडी खुली असल्याने घाण व दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे कचरा प्लास्टिक पिशवीमध्ये बांधून नागरिक लांबूनच टाकून निघून जातात. कचराकुंडीत पडला की, बाजूला पडला याकडेदेखील लक्ष देत नाहीत. यावर उपाययोजना म्हणून या नव्या कुंडय़ा बसविण्याचा विचार चालविला आहे. कुंडी जमिनीखाली असल्याने वरच्या बाजूला केवळ कचरा टाकण्यासाठी झाकण असलेला डबा असतो. झाकण उघडून त्यामध्ये कचरा टाकल्यामुळे आजूबाजूला कचरा पसरत नाही. तसेच दुर्गंधी देखील पसरत नाही. कचराकुंडी भूमिगत असल्याने भटकी जनावरे किंवा कुत्र्यांचादेखील उपद्रव थांबणार आहे.

Related Stories

बेजबाबदारपणामुळे मतदानापासून वंचित

Amit Kulkarni

कासव तस्करी करणाऱया दोघांना अटक

Amit Kulkarni

50 वर्षांपूर्वीच्या मित्रांनी दिला आठवणींना उजाळा

Omkar B

संगोळ्ळी रायण्णा स्मारकासाठी निधी मंजूर करण्याची ग्वाही

Amit Kulkarni

आधार सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Patil_p

बेळगाव सराफी व्यापारी संघटनेतर्फे आज ध्वजवंदन

Patil_p
error: Content is protected !!