तरुण भारत

जिल्हय़ात मंगळवारी 88 जणांनी केली कोरोनावर मात

नवीन रुग्णसंख्या 10 वर, 3 जणांचा मृत्यू, आता केवळ 229 कोरोना सक्रिय रुग्ण

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

गेल्या 24 तासात कोरोनामुळे जिल्हय़ातील आणखी तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर मंगळवारी 10 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोनामुक्त झालेल्या 88  जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढतच चालली असून ती आता 918 वर पोहोचली आहे.

सध्या जिल्हय़ामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या घटत चालली असली तरी मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सोमवारी कोरोनाने चार जणांचा मृत्यू झाला होता तर मंगळवारी तिघांचा मृत्यू झाला आहे. गोकाक तालुक्मयातील 68 वषीय, बेळगाव तालुक्मयातील 74 वषीय, चिकोडी तालुक्मयातील 62 वषीय वृद्ध दगावले आहेत. कोरोना रुग्ण कमी होत चालले आहेत. ही बाब दिलासादायक असली तरी वृद्ध झालेले व्यक्ती या कोरोनामुळे दगावताना दिसत आहेत. आतापर्यंत जिल्हय़ामध्ये 918 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हय़ामध्ये 229 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 79 हजार 663 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यामधील 78 हजार 516 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Related Stories

कडोलीतील मराठी भाषिकांकडून पंतप्रधानांना 500 पत्रे

Amit Kulkarni

कित्तूर उत्सव साधेपणाने

Rohan_P

म. ए. समितीच्या सर्व गटांनी एकत्र येणे गरजेचे

Amit Kulkarni

विवाह सोहळय़ांच्या परवानगीसाठी मनपात गर्दी

Amit Kulkarni

साखर कारखानदारांविरोधात केल्या तक्रारी

Amit Kulkarni

हिरेबागेवाडीला राज्य परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकांची भेट

Patil_p
error: Content is protected !!