तरुण भारत

खा. उदयनराजेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

सातारा :

सातारा हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराने अनेक स्थित्यंतरे पहिली आहेत. आता कुठे खरी विकासाची दिशा शहराला मिळाली आहे. शहराच्या विकासाची कुंठीत अवस्था यापुढे राहणार नाही. त्यासाठी कशाचाही त्याग करावा लागला तरी सातारकरांसाठी आम्ही तो करायला तयार आहे. सध्या विकसनशील अवस्थेत असलेल्या सातारा शहराला विकसीत आणि सुरक्षित शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कोणत्याही खस्ता खायची आमची तयारी आहे, असे दृढनिश्चयात्मक उद्गार सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

Advertisements

पोवई नाका, पोवई नाका ते जुने आरटीओ ऑफिस चौक तसेच जरंडेश्वर नाका ते वाढे फाटा चौक या रस्त्याचे रुंदीसह चौपदरीकरण करण्याच्या कामाचे भुमिपूजन उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शहराचे नाक असलेल्या या भागातील ग्रेड सेपरेटरमुळे सातारच्या विकासात निश्चितच भर पडली आहे. राज्यातील कोणत्याही नगरपरिषद क्षेत्रात ग्रेडसेपरेटरसारखे काम यापूर्वी कुणीही केलेले नाही. याचे संपूर्ण श्रेय सातारकरांचे आहे.

सातारा शहरात प्रवेश करण्यासाठी वाढे फाटयावरुन एक मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरुन महामंडळाची सेवा सुरु असते. सदरचा रस्ता बेल्हे-शिक्रापूर-जेजूरी-लोणंद-सातारा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 117 चा हिस्सा आहे. त्यामुळे हा रस्ता केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा करुन मंजूर करण्याबाबत आग्रह धरला होता. या रस्त्याच्या रुंदीकरणास मंजूरी मिळाल्याने, सातारा शहर वाढे फाटा ते पावईनाका या रस्त्याच्या रस्ता रुंदीकरण आणि चौपदरीकरणाचा शुभारंभ करण्यात येत आहे.

या कामात जुने आरटीओ चौक ते पावईनाका या 1400 मिटर लांबीमध्ये 18.20 मिटर रुंदीने चौपदरीकरण करणे, तसेच याच ठिकाणी 500 मिटर लांबीमध्ये सायकल ट्रक बांधणे तसेच वाढेफाटा ते जरंडेश्वर नाका या रस्त्याच्या अस्तित्वातील लांबीमध्ये 10 मिटरने डांबरीकरण करणे, जरंडेश्वर नाका, जुने आरटीओ चौक आणि पारंगे चौक याठिकाणील चौक सुधारणा आणि दोन ठिकाणी नवीन मोरी बांधकाम करणे आदी कामांचा समावेश आहे. या सर्व कामांव्दारे एकूण 3.200 कि.मी. लांबेची सुधारणा करणे प्रस्तावित आहे. या कामाची अंदाजपत्रकीय मंजूर रक्कम 14 कोटी 16 लाख रुपये आहे.

यावेळी नगरसेवक राजु तुकाराम भोसले, किशोर शिंदे, सुहास राजेशिर्के, नगरसेविका सुजाता राजेमहाडीक, स्मिता घोडके, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नियोजन सभापती स्नेहा नलवडे आदी उपस्थित होते.

Related Stories

राजपथावर बेशिस्त वाहतुकीचा युवक ठरला बळी

Amit Kulkarni

तिजोरीतील खडखडाटाने पालिकेत बचतीचे धोरण

Amit Kulkarni

वाकळवाडीत कोरोनाबाधिताची संख्या पोहचली तीनवर

Patil_p

सातारा तालुक्यात सहा मृत

Patil_p

जावली बँकेबाबत आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱया तिघांवर गुन्हा

Patil_p

वाळू माफीयांना 2 कोटी दंडाची नोटीस

Patil_p
error: Content is protected !!