तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू

4 मृत्यू, 48 नवे रूग्ण, 91 कोरोनामुक्त, शहर आणि जिल्ह्यातील दोघांचा समावेश

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

जिल्ह्यात बुधवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जिल्ह्यातील आणि शहरातील दोघांचा समावेश आहे. दिवसभरात 46 नवे रूग्ण आढळले तर 91 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 541 आहे. दिवसभरात परजिल्ह्यातील मृत्यूची नोंद निरंक राहिली आहे.

जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने शहरातील शिवाजी पार्क झोपडपट्टी आणि अन्य एकाचा सीपीआर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. शिरोळ तालुक्यातील नांदणी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील दोघींचा कोरोनाने मृत्यू झाला. परजिल्ह्यातील कोरोना मृत्यू नोंद निरंक राहिली. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 763 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3 हजार 85, नगरपालिका क्षेत्रात 826, शहरात 1 हजार 251 तर अन्य 601 आहेत. दिवसभरात 91 जण कोरोनामुक्त झाले.

कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 99 हजार 551 झाली आहे. गेल्या 24 तासांत 46 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 1, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 5, कागल 1, करवीर 3, पन्हाळा 0, राधानगरी2, शाहूवाडी 2, शिरोळ 3, नगरपालिका क्षेत्रात 4, कोल्हापुरात 25 तर परजिल्ह्Îातील तिघांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 5 हजार 855 झाली आहे. जिल्ह्यात आजरा, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, पन्हाळा तालुक्यात नवी रूग्ण संख्या नोंद शुन्य राहिली. सद्यस्थितीत शहरात 8 आणि ग्रामीण भागात 226 जण होम कोरोंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.

कोरोना रूग्ण : 46 एकूण : 2,05,855
कोरोनामुक्त : 91 एकूण : 1,99,551
कोरोना मृत्यू : 4 एकूण मृत्यू : 5763
सक्रीय रूग्ण : 541

Related Stories

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा आक्रोश, महावितरणचे मौन

triratna

सातारा जिल्हय़ात मृत्यूचा आकडा दोनशे पार; चिंता वाढली

triratna

कोल्हापूरचा शाही दसरा शुक्रवारी रंगणार!

triratna

बहिरेश्वर सरपंच निवड प्रक्रियेला स्थगिती

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासात 1 हजार 76 कोरोनामुक्त, ‘कोरोना’चे 34 बळी

triratna

सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कुरुंदवाडे लाचलुचपतच्या जाळ्यात

triratna
error: Content is protected !!