तरुण भारत

ट्रकचालकांना डुलकी लागताच वाजणार सेन्सर

रस्ते दुर्घटना टाळण्यासाठी सरकारची नवी योजना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशभरात दरवर्षी मोठय़ा प्रमाणार होणाऱया रस्ते दुर्घटनांमुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागतो. याचमुळे या दुर्घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरले आहे. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासनाला नवे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार ट्रकचालकांच्या चुकांमुळे किंवा त्यांना ट्रक चालविताना डुलकी लागल्याने होणाऱया दुर्घटनांना रोखण्यास मोठी मदत होणार आहे.

राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत गडकरींनी हे आदेश दिले आहेत. तसेच सर्व राज्य सरकारांना आणि जिल्हाधिकाऱयांना निर्देश दिले जाणार असल्याचे म्हटले आहे. रस्ते दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी गडकरींनीच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा गटाची स्थापना केली आहे. या गटाची दर दोन महिन्यांनी बैठक आयोजित होत त्यात संभाव्य उपाययोजनांवर चर्चा केली जाते. ट्रकमुळे होणाऱया दुर्घटनांवर तोडगा काढण्यासाठी गडकरींनी अभिनव संकल्पनेवर चर्चा केली असून त्यासंबंधी प्रशासनाला निर्देश देखील दिले आहेत.

मालवाहू ट्रकचालक लांब पल्ल्याचा प्रवास करत असतात. या दीर्घ प्रवासादरम्यान त्यांना डुलकी लागण्याची शक्यता देखील असते. अशाच काही घटनांमुळे मोठय़ा दुर्घटना झाल्याचे आढळून आले आहे. याचमुळे ट्रकचालकांना डुलकी लागू नये म्हणून देशातील सर्व वाणिज्यिक वापराच्या ट्रकमध्ये ‘ऑन-बोर्ड स्लीप डिटेक्शन सेन्सर्स’ म्हणजेच चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसविण्यात येणार आहेत.

ट्रक चालविण्याचे तास

ट्रकचालकांचे ड्रायव्हिंगचे तास निश्चित करण्याचे निर्देश या बैठकीत गडकरींनी दिले आहेत. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱयांना पत्र लिहून जिल्हा रस्ते समितीच्या बैठका नियमित स्वरुपात होतील याची काळजी घेण्याचे निर्देश देणार असल्याचे गडकरींकडून सांगण्यात आले.

Related Stories

देशात मागील 24 तासात 2.11 लाख नवीन कोरोना रुग्ण; 3,842 मृत्यू

Rohan_P

अमरिंदर सिंग यांच्याकडून काँग्रेसचा राजीनामा; नव्या पक्षाचीही घोषणा

datta jadhav

पश्चिम बंगालसाठी भाजपची नवी सूची घोषित

Patil_p

पाकचे 8 सैनिक ठार; बंकर्स, लाँच पॅड्सही उध्वस्त

datta jadhav

पाच वर्षाच्या विहानने एकट्याने केला दिल्ली ते बंगळूरू विमानप्रवास

Omkar B

पंतप्रधान बिहारमध्ये 12 प्रचारसभा घेणार

Patil_p
error: Content is protected !!