तरुण भारत

टॉमशी विवाह केल्याने कारकीर्द बुडाली

निकोल किडमनचा 20 वर्षांनी खुलासा

हॉलिवूड अभिनेत्री निकाले किडमन आणि टॉम क्रूज एकेकाळी सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. दोघेही नेहमीच चर्चेत असायचे. दोघांनी 1990 मध्ये वाह केला होता. थंडर या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दोघे परस्परांना पहिल्यांदा भेटले होते. दोघांचे वैवाहिक संबंध सुमारे एक दशकापर्यंत टिकले, त्यांनी दोन मुलांना दत्तकही घेतले होते. पण 2001 मध्ये ते विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटाचा विषय आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत राहिला होता.

Advertisements

निकोलने आता हार्पर बाजारला दिलेल्या मुलाखतीत विवाह अन् घटस्फोटाबद्दल भूमिका मांडली आहे. विवाह आणि वैयक्तिक आयुष्याला प्रसारमाध्यमांकडून प्रचंड प्रसिद्धीचा झोत मिळाल्याने याचा फटका माझ्या कारकीर्दीला बसल्याचे निकोलने सांगितले आहे.

घटस्फोटानंतर मी खचले होते, विवाहानंतर माझ्या कारकीर्दीचा वेग कमी झाला होता असे निकोलने म्हटले. टॉमपासून विभक्त झाल्यावर निकोलने कीथ अर्बनसोबत विवाह केला होता. या दांपत्याला आता 3 अपत्य आहेत. तर टॉम क्रूजने अभिनेत्री केटी होल्मसशी 2006 मध्ये विवाह केला होता. दोघांनाही एक मुलगी आहे. पण टॉम आणि केटी यांचा 2012 मध्ये घटस्फोट झाला होता.

Related Stories

दख्खनचा राजा ज्योतिबा लवकरच येणार भेटीला

Patil_p

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे निधन

Rohan_P

रामायणात आहे यावर मुलांचा विश्वासच नव्हता : स्वप्निल जोशी

Patil_p

14 फेरे’तील भूमिका आव्हानात्मक

Patil_p

ड्रग्ज प्रकरण : एनसीबीकडून मुंबईत 3 ठिकाणी धाडी

Rohan_P

आलियाचे चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण

Patil_p
error: Content is protected !!