तरुण भारत

‘एव्हरग्रँड’च्या दिवाळीखोरीचा धनाढय़ांना फटका

टेस्लाचे एलॉन मस्क यांना सर्वाधिक नुकसान – कंपनीवर 300 अब्ज डॉलरचे कर्ज

नवी दिल्ली

Advertisements

 चीनची दुसऱया क्रमांकाची सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी एव्हरग्रँड दिवाळखोरीत निघाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडली असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये कंपनीवर जवळपास 300 अब्ज डॉलरचे कर्ज असून सदरच्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरली आहे.

चीनमधील फॉरेन ब्रँड्समध्ये या कंपनीची जवळपास 9 टक्क्यांची हिस्सेदारी राहिली आहे. एव्हरग्रँड संकटात सापडल्याने सोमवारच्या सत्रात जगभरातील शेअर बाजारात घसरणीचा कल राहिला होता. यानंतरच्या एकाच दिवसात जगातील 500 हून अधिक श्रीमंत लोकांनी नेटवर्थ रुपात 135 अब्ज डॉलर गमावले आहेत. आशिया आणि भारतामधील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानींच्या एकूण नेटवर्थपेक्षा कितीतरी अधिक आहे. ब्लूमबर्ग बिलेनियरच्या निर्देशांकांनुसार त्यांची नेटवर्थ 92.2 अब्ज डॉलर असल्याची माहिती आहे.

या सर्व घडामोडींच्या प्रभावामुळे जगातील काही श्रीमंतांना नुकसान सहन करावे लागले असून याचा मोठा फटका हा इलेक्ट्रिक कार निर्मिती करणारी कंपनी टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांना बसला आहे. एका दिवसात त्यांच्या नेटवर्थमध्ये 7.2 टक्क्यांची घसरण होऊन ते 198 अब्ज डॉलरवर राहिले आहे. मंगळवारी त्यांचे नेटवर्थ 2.25 अब्ज डॉलर वधारुन 200 अब्ज डॉलरवर पोहोचले. दुसऱया बाजूला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांचे नेटवर्थ सोमवारी 5.6 अब्ज डॉलरने घटले आहे. 194 अब्ज डॉलरच्या नेटवर्थसोबत श्रीमंतांच्या यादीत ते दुसऱया स्थानी राहिले आहेत.

एव्हरग्रँडजवळ साधारणपणे 355 अब्ज डॉलरची ऍसेट्स आहेत. एव्हरग्रँडवर कर्जाचे ओझे असतानाही त्यांनी आक्रमक रणनिती आखत विस्ताराची प्रक्रिया राबवली होती. हीच चूक सदरच्या कंपनीला महागात पडली असल्याचे बोलले जात आहे.

भारतामधील स्थिती

भारतात काही कंपन्यांचा संबंध एव्हरग्रँडशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेला आहे. विशेष करुन स्टील, केमिकल्स आणि धातू क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना याची झळ बसू शकते. आपल्या उत्पादनातील मोठा हिस्सा भारतीय कंपन्या एव्हरग्रँडच्या मदतीने चीनच्या रियल इस्टेट बाजारामध्ये विक्री करतात. एव्हरग्रँडच्या दिवाळीखोरीमुळे सेन्सेक्स कोसळला आहे. प्राप्त अहवालानुसार जपानमधील टॉयलेट, एसी, पेन्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे समभाग जमिनीवर आले आहेत. अन्य देशातील बाजारही प्रभावीत झाले होते.

Related Stories

हुआई नफा कमाईत कपात करण्याच्या तयारीत

Patil_p

विदेशी गुंतवणूकदारांकडून 1997 कोटीची भर

Patil_p

अर्थव्यवस्थेतील सुस्तीमुळे बेरोजगारीत वाढ

tarunbharat

इंडियन ऑइलचा निव्वळ नफा दहापट वाढला

Patil_p

कृष्ण कुलदैवत एक

tarunbharat

खरेदीच्या जोरावर शेअर बाजारात तेजी

Patil_p
error: Content is protected !!