तरुण भारत

मलबार ग्रुप करणार 750 कोटींची गुंतवणूक

बेंगळूर

 देशातील दागिन्यांच्या क्षेत्रातील मलबार गोल्ड ऍण्ड डायमंड्स यांनी तेलंगाणात 750 कोटींची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे.

Advertisements

रिफायनरी व निर्मिती कारखाना उभारण्यासाठी सदरची गुंतवणूक असणार आहे. उद्योग व आयटी मंत्री के. टी. रामाराव यांच्यासोबत मलबार गुपचे चेअरमन एम. पी. अहमद यांची बैठक पार पडली होती. गुंतवणुकीबाबत त्यात निर्णय घेण्यात आला. उद्योग सचिव जयेश रंजन व आयटी व उद्योग क्षेत्रातील वरि÷ अधिकारी (तेलंगाणा) यांच्यासह मलबार ग्रुपच्यावतीने एमडी ओ ऍशर, व्हाईस चेअरमन के. पी. अब्दुल सलाम, मुख्य वित्त अधिकारी एस. रामकृष्णन, रिटेल मुख्य पी. के. सिराज बैठकीला उपस्थित होते. हैदराबादच्या इंडस्ट्रीयल पार्कमध्ये कारखाना उभारला जाणार असून त्याकरिता 3.7 एकरची जागा लागणार आहे. प्रकल्पांतर्गत 2500 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तेलंगाणात मलबारची 15 रिटेल शोरुम्स असून 1000 जणांना रोजगार मिळालेला आहे. एवढेच नाही तर 10 देशात मलबारची 260 स्टोअर्स कार्यरत आहेत.

Related Stories

दोन कंपन्यांचा दबदबा योग्य नाही – ट्राय

Patil_p

वन प्लसचा भारतात गुंतवणुकीचा निर्णय

Patil_p

जपून चाल…

Omkar B

फेब्रुवारीपर्यंत 92 गीगावॅट अक्षय ऊर्जेचे उत्पादन

Patil_p

देशाच्या जीडीपीपेक्षा लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य अधिक

Patil_p

…तर 2.8 लाख कोटींचा फटका बसणार?

Patil_p
error: Content is protected !!