तरुण भारत

भारतीय बाजारात ऑडीच्या नवीन इलेक्ट्रिक कार दाखल

चालू वर्षातील फेब्रुवारीत झाले होते सादरीकरण

नवी दिल्ली 

Advertisements

 ऑडी कंपनीने भारतामधील आपली इलेक्ट्रिक ई-टॉर्न जीटी आणि आरएस ई टॉर्न जीटी लाँच केली आहे. ई-टॉर्न जीटीची प्रारंभीची एक्स शोरुम किमत 1.80 कोटी रुपये आणि आरएस ई-टॉर्न जीटीची प्रारंभीची एक्स शोरुम किमत 2.05 कोटी रुपये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

ऑडीने ई-टॉर्न जीटी हे मॉडेल चालू वर्षातील फेबुवारीत सादर केले होते. भारतात हे सर्वात मजबूत मॉडेल राहणार असून याची टक्कर ही थेट टेस्लाच्या मॉडेल एस प्लेड आणि पोर्शे टेकनसोबत राहणार आहे.

इंजिन क्षमता ः ई-टॉर्न जीटीची मोटार 470 एचपी पॉवर आणि 630 एनएमचा टॉर्क जनरेट करते. तसेच यामध्ये ऍडिशनल 522 एचपी पॉवर आणि 10 एनएमचा ओव्हरबूस्ट मोड दिला आहे. या प्रकारे आरएस ई-टॉर्न जीटी मोटर 590 एचपी पॉवर आणि 830 एनएम चा टॉर्क जनरेट करत असून यामध्ये ऍडिशनल 637 एचपी पॉवर मोड दिला आहे.

Related Stories

हय़ुंडाईची ‘अल्काझार’ कार बाजारात दाखल

Patil_p

टीव्हीएस मोटर्सची विक्री तेजीत

Patil_p

BMW ची ‘ग्रॅन कुपे’, ‘एम 8 कुपे’ भारतात लॉन्च

datta jadhav

नवी इकोस्पोर्ट एसई दाखल

Amit Kulkarni

‘एक्सयुव्ही 700’ च्या 25,000 गाडय़ा 57 मिनिटात बुक

Amit Kulkarni

BS6 इंजिनसह होंडा ‘शाईन’ लाँच

tarunbharat
error: Content is protected !!