तरुण भारत

सावधान, ऑनलाईन शॉपिंग-फसवणुकीचा नवा धंदा

सध्याचा जमाना हा तंत्रज्ञानाचा असून, हातातील स्मार्ट फोन, हायस्पीड इंटरनेट, ऑनलाइन कंपन्यांकडून देण्यात येणाऱया भरघोस सवलती, मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या किमतींपेक्षा कितीतरी कमी किंमत, एका क्लिकवर आवडलेली वस्तु थेट तुमच्या घरी हजर होत असल्यामुळे ऑनलाइन खरेदीला आता सर्व वर्गातून पसंती देण्यात येऊ लागली आहे. ऑनलाइन विक्रीचे मार्केट मोठय़ा प्रमाणावर वाढू लागले आहे.

प्रत्येकाकडे असलेला स्मार्टफोन, त्यातील
व्हॉटसऍप ग्रुप, आवडत्या कंपन्यांकडून खरेदी करण्यासाठी वेळोवेळी केलेले गुगल सर्च यामुळे थेट ग्राहकांना वारंवार ऑनलाइन कंपन्यांकडून देण्यात येणाऱया सवलती याचे न चुकता मेसेज येत राहतात. त्यामुळे आता ऑनलाइन खरेदीची मानसिकता वाढू लागली आहे. ग्राहकांची ही मानसिकता लक्षात घेऊन बडय़ा कंपन्या ऑनलाइन विक्रीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्याचमुळे की काय आज ‘ऑनलाइन शॉपिंग हा जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे’. कोणत्याही वस्तूची शॉपिंग करायची म्हटल्यावर सर्रास आजकाल प्रत्येक जण ऑनलाइन किंमत किती आहे, व्हरायटी किती आहेत, दुकानातील किंमत व ऑनलाईन किंमत ह्या बाबी तपासतो आणि सरतेशेवटी ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय स्वीकारतो.

Advertisements

मात्र हे सर्व व्यवहार करत असताना कशाप्रकारे आमिष दाखविले जाते, युपीआय किंवा मोबाईल वॅलेटद्वारे कसे फसविले जाते हे जाणून घेणे आवश्यक आहे. प्रत्येकजण म्हणत असतो, माझ्या बाबतीत हे घडूच शकत नाही. मात्र जर घडले तर सांगत नाहीत आणि मग त्यांची घुसमट होऊ लागते. कोणाला सांगायचे काही हजार पैसे तर गेले. हातात तर काही नाही. म्हणून ऑनलाईन खरेदी करतेवेळी अतिआत्मविश्वास असू नये.

ऑनलाईन शॉपिंग, ज्यामुळे लोकांना त्यांच्या घरातील सर्व वस्तू खरेदी करता येतात. आपल्याला हवी असलेली वस्तू वा उत्पादन शोधण्यासाठी यापुढे दुकाने किंवा डीपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, खरेदी केल्यावर चेकआऊट काउंटरवर यापुढे लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. आज तारखेला ई-कॉमर्स अतिशय जलदगतीने आपल्या खरेदीची पद्धत बदलवून टाकत आहेत. परंतु,  इतर सर्व गोष्टींप्रमाणे, ऑनलाइन खरेदीचे जग सर्वक्षम सुरक्षित नाही आहे. ह्या असुरक्षित बाबी ई-कॉमर्स कंपन्या दूर करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत मात्र हे सायबर क्रिमिनल्स त्याला पूरुन उरत आहेत. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ऑनलाईन खरेदी करताना वेगवेगळय़ा पध्दतीने फसवले जाण्याची शक्मयता असते. विशेष करुन महिला व मुलींना डोळय़ासमोर ठेवून फसवणुकीचे जाळे तयार केले जाते. मग ह्या शक्मयता कोणत्या?

कमी किंमतीत महाग ब्रँडेड उत्पादने देण्याबाबत जाहिराती असतात. सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये आपल्याला बऱयाचदा महाग ब्रँडेड उत्पादने अगदी विश्वास बसणार नाही इतक्मया स्वस्त किंमतीवर मिळण्याच्या जाहिराती दिसतात. या जाहिराती ग्राहकांच्या विशेष करुन महिलांचे लक्ष वेधून घेतात. ह्या महिला त्या ब्रँडेड वस्तू, ज्या डुप्लीकेट आहेत त्या खरेदीसाठी पैसे देतात. प्रश्न असा आहे की खरेच ह्या ब्रँडेड आहेत का? आणि असतील तर इतक्मया स्वस्त कशा? असे प्रश्न त्यांना पडत नाहीत. कोणताही विचार न करता खरेदी केली जाते.

महाग दागिनेः सायबर गुन्हेगार काही खोटय़ा पण खऱया दिसणाऱया दागिन्यांच्या वेबसाइट्स तयार करुन फसवू शकतात. ह्या वेबसाईटद्वारे महिला ग्राहकांना लक्ष्य करून दागिन्यांच्या उत्पादनांसाठी आकर्षक सवलतीच्या ऑफर देतात. बऱयाचदा मोठी किमतीची वस्तू किंवा दागिने खरेदी केली जाते मात्र प्रत्यक्ष हातात पडतो छोटासा दागिना किंवा कमी किमतीची वस्तु. हे लक्षात आल्यावर जेव्हा वेबसाईट्शी संपर्क साधला जातो किंवा तक्रार केली जाते. तेव्हा ही वेबसाईट एक तर खोटी असते किंवा ते खरेदी नाकारतात. यामुळे तुमच्या पैशाचे नुकसान होते.

वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक उपायः बऱयाचदा सोशल नेटवर्किंग आणि इन्स्टंट मेसेजिंग ऍप्लीकेशन्समध्ये वजन कमी करण्याच्या टिप्स देणारे संदेश येतात आणि पुढे ते त्यांचे उत्पादन खरेदी करण्यासाठी पेमेंटची विनंती करतात. वजन कमी करण्यासाठी हतबल झालेल्या महिला या संदेशांमुळे अडकतात व त्या बनावट उत्पादनांसाठी ऑनलाईन पध्दतीने पैसे देतात.

ऑनलाइन खरेदीमध्ये कोणते धोके आहेत, हे समजण्यासाठी काही प्रश्न लक्षात घ्या.

प्रथम ज्या ब्रँडची खरेदी करावयाची आहे ती ई-कॉमर्स साइट अस्सल म्हणजे खरी आहे का? त्यांची आहे का? त्यावरील पेमेंट सिस्टीम कोणती? याची माहिती घ्या. ह्या वेबसाईटद्वारे तुम्ही दिलेली बँकेची किंवा पेडिटकार्डची माहिती गोपनिय ठेवली जाणार आहे का? शिपिंग योग्य पध्दतीने होत आहे का? तुम्ही ऑर्डर दिलेली वस्तूच तुम्हाला मिळत आहे ना? वेबसाईटवरील लोकांनी दिलेले रिव्ह्युव वाचणेही गरजेचे आहे. सुरक्षित ऑनलाइन खरेदीसाठी लक्षात ठेवा, संगणक, फोन ओएस अपडेट ठेवाः आपला पीसी अँटीव्हायरस, अँटी स्पायवेअर, फायरवॉल, या सर्वांसह अद्ययावत केलेली ऑपरेटींग सिस्टीम असावी. विश्वासार्ह साइटसह वेब ब्राउझर सुरक्षा आणि सिक्मयुरिटी सेटींग्स ठेवावीत.

वेबसाइटच्या सुरक्षा बाबी तपासाः जर तुम्ही ऑनलाइन काही खरेदी करण्यास तयार असाल तर ब्राउझर ऍडेस बारवर किंवा स्टेटस बारवर प्ttज्s किंवा पॅडलॉकसह साइट सुरक्षित आहे का ते तपासा आणि नंतरच आर्थिक व्यवहार करा.

आपल्या डिजिटल पेमेंटची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री ठेवा. तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यावर लगेच पेडिट कार्ड स्टेटमेंट तपासा आणि तुम्ही दिलेल्या शुल्काबद्दल माहिती करून घ्या; आणि तुम्हाला काही बदल आढळल्यास ताबडतोब संबंधित अधिकाऱयांना कळवा.

वेबसाइटवर कार्ड तपशील किंवा बँक तपशील सेव्ह करू नकाः शॉपिंग वेबसाइटवर कार्ड किंवा डेबिट किंवा पेडिटच्या डीटेल्स सेव्ह करु नका. आपले ऑनलाइन शॉपिंग पूर्ण झाल्यानंतर सर्व वेब ब्राउझर कुकीज डीलिट करुन टाका. 

तुम्ही केलेल्या खरेदीबद्दल विचारणाऱया ईमेलला किंवा फिडबॅकला कधीही प्रतिसाद देऊ नकाः ‘कृपया आपले पेमेंट, खरेदी आणि उत्पादनासाठी खात्याच्या तपशीलाची खात्री करा’ यासारख्या ईमेलपासून सावध रहा. लक्षात ठेवा कायदेशीररित्या व्यवसाय करणारे उत्पादक अशाप्रकारे कधीही ईमेल पाठवत नाहीत. आलेच तर खरेदी झाल्याचे इमेल येऊ शकतात.

पासवर्ड वारंवार बदलाः बराच वेळ एकच पासवर्ड वापरू नका, तुमचा पासवर्ड बदला. ईमेल आयडी, बँक खाते, पेडिट-डेबिट कार्ड पासवर्ड वारंवार बदलत रहा. शक्मयतो वेगवेगळय़ा संकेतस्थळांसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा. जर तुम्ही सर्वांसाठी समान पासवर्ड वापरत असाल आणि जर हॅकर्सने तुमचा एक पासवर्ड क्रॅक केला तर ते इतर सर्व व्यवहार होणाऱया वेबसाईट व मोबाईल ऍप क्रॅक करू शकतात. त्यामुळे सर्व संकेतस्थळांसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा. सार्वजनिक वाय-फाय, हॉट-स्पॉट ऑनलाईन खरेदीसाठी धोकादायक व सायबर हल्ल्यांसाठी सोपे ठरु शकते.

सवलती/ बक्षिसे देणाऱया लिंकवर क्लिक करू नका. सायबर गुन्हेगारांसाठी लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट्सच्या मोठय़ा सवलतीसह संदेश पाठवणे सहज शक्मय होते. व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये किंवा अज्ञात क्रमांकावरून प्राप्त झालेल्या लिंकवर क्लिक करण्याऐवजी ऑफर्ससाठी मूळ वेबसाइटवर तपासणे नेहमीच चांगले असते. म्हणून ऑनलाईन शॉपिंग हा एक फसवणुकीचा नवा धंदा सुरु झाला आहे. त्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.

-विनायक राजाध्यक्ष, सांगली

Related Stories

कोरोना आणि मुख्यमंत्री विरोधाचा आलेख वाढताच!

Amit Kulkarni

वऱहाड निघालें द्वारकेबाहेरी

Patil_p

पडिलें मौन वैखरिये

Patil_p

गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट

Patil_p

रेल्वेचा बदललेला आधार

Patil_p

कोरोना फैलावामुळे ‘ऑनलाईन’च्या कक्षा रुंदावणार

Patil_p
error: Content is protected !!