तरुण भारत

किरीट सोमय्या मंगळवारी कोल्हापुरात

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना पाठविले पत्र, अंबाबाई दर्शनासह संताजी घोरपडे कारखान्याला देणार

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारे भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या येत्या मंगळवारी (28 सप्टेंबर) कोल्हापुरात येणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनासह आपण कागल तालुक्यातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला बाहेर भेट देणार असल्याचे सोमय्या यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना एका पत्रकाव्दारे कळविले असल्याची माहिती कोल्हापूर भाजपच्या वतीने देण्यात आली.

सोमय्या यांनी आपला दौरा कार्यक्रम पोलीस अधीक्षकांना पाठविला आहे. सोमवारी (20 सप्टेंबर) सोमय्या कोल्हापूरला येणार होते, पण जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कोल्हापूर पोलिसांनी त्यांना कराड येथेच रोखले होते. पण आता सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापूर दौऱयाची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलीस दलालाही नियोजनासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, सोमय्यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार? याकडेही राजकीय वर्तुळासह सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत इडीच्या कार्यालयात कागदपत्रे सादर केलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना गेल्या सोमवारी 20 सप्टेंबरला कोल्हापूर प्रवेश करण्यास कोल्हापूर पोलीस दलाने मनाई केली होती. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सोमय्या यांना विनंती करून पोलिसांनी कराड येथे रोखले होते. त्यामुळे सोमय्या यांनी कोल्हापूर ऐवजी कराडमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफांना आरोप केले होते. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले होते. त्याचवेळी त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेत मी पुन्हा कोल्हापूरला येणार असे स्पष्ट केले होते.


 पोलीस अधीक्षकांना दौऱ्याचे पत्र 

सोमय्या यांनी बुधवारी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या नावाने एक पत्र पाठविले आहे. या पत्रात मंगळवार 28 सप्टेंबर रोजी आपण कोल्हापूर दौऱयावर येत असून अंबाबाईचे दर्शन आपण बाहेरून घेणार असून सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याची भेट (पाहणी) बाहेरून करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी जाणार आहे. पोलीस अधीक्षकांची भेट घेणार घेणार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. या दौऱयात सोमय्या भाजपच्या ग्रामीण, शहर पदाधिकाऱयांच्या बैठकीत मार्गदर्शन करणार असून पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत.

Related Stories

३६ जिल्ह्यांना आमदार रोहित पवारांकडून मदत

triratna

कोरोना : महाराष्ट्रात मागील 24 तासात 15,229 नवे रुग्ण; 307 मृत्यू

Rohan_P

लसीकरण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Rohan_P

मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतोय… : राज ठाकरे

Rohan_P

वस्त्रनगरीतील यशस्वी उद्योजक मल्लय्या दत्तात्रय स्वामी यांचे वृध्दापकाळाने निधन

triratna

मिर्ची दरवाढीचा उडतोय भडका

Patil_p
error: Content is protected !!