तरुण भारत

पंतप्रधान मोदींचे अमेरिकेला प्रयाण

5 दिवसांचा दौरा, भरगच्च कार्यक्रम, बायडन यांच्याशी चर्चेकडे साऱयांची दृष्टी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी अमेरिकेच्या 5 दिवसांच्या दौऱयासाठी त्या देशाकडे प्रयाण केले आहे. या पाच दिवसांमध्ये त्यांचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यापैकी अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये चर्चा आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत भाषण हे दोन सर्वात महत्वाचे कार्यक्रम आहेत.

याशिवाय ते क्वॉडच्या परिषदेतही भाषण करणार आहेत. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याची त्यांची चर्चा होणार असून या चर्चेकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. कोरोना संबंधीच्या शिखर परिषदेतही ते व्हर्चुअल पद्धतीने सहभागी होतील. क्वालकोम, ऍडोब अँड ब्लॅकस्टोन आदी जगप्रसिद्ध कंपन्यांच्या सीईओंशी ते बोलणी करतील. इतरही अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असेल.

संबंध अधिक दृढ करणार

बायडन यांच्याशी चर्चेत भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांचा फेरआढावा घेतला जाईल. तसेच अमेरिकेशी सामरिक आणि धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यावर भारताचा भर आहे. भारत प्रशांतीय क्षेत्राची सुरक्षा आणि या क्षेत्रावरील एकाधिकारशाहीला विरोध आदी मुद्देही चर्चेत येतील. गुंतवणूक आणि अर्थिक संबंधांवरही काही ठोस पावले अपेक्षित आहेत.

अफगाणिस्तान महत्वाचा मुद्दा

अफगाणिस्तानचा ताबा तालिबानने घेतल्यानंतर तेथे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी ते बायडन यांच्याशी बोलतील. हॅरिस यांच्याशी होणाऱया चर्चेतही या मुद्दय़ावर उहापोह होणार आहे. विशेषतः तालिबान राजवटीला मान्यता द्यायची की नाही, या संबंधी जगाने एकत्रित भूमिका घेणे आवश्यक आहे, असे भारताचे म्हणणे आहे. त्यावरही अमेरिकेचे मत आजमावले जाईल.

दौऱयातील कार्यक्रम…

ड गुरुवार- क्वालकोम सीईओ ख्रिश्चियानो अमोन आणि ऍडोबचे अध्यक्ष शंतनू नारायण यांच्याशी चर्चा, फर्स्ट सोलार कंपनीचे सीईओ मार्क विडमर यांच्याची बोलणी, तसेच जनरल ऍटोमिक्स आणि ब्लॅकस्टोन सीईओ जार्झमन यांच्याशी गुंतवणुकीसंदर्भात चर्चा होईल असे सांगयण्या आले.

ड शुक्रवार- अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशी चर्चा, नंतर जपानचे पंतप्रधान योशिहिडो सुगा यांच्यासी संवाद, नंतर व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांच्याची चर्चा, जेवणाच्या सुटीनंतर व्हाईट हाऊसमध्ये क्वॉडची बैठक, नंतर व्हाईट हाऊसमधून न्यूयॉर्कला प्रयाण.

ड शनिवार- संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण बैठकीसमोर भाषण, नंतर भारताकडे परतीचा प्रवास               

Related Stories

आसाममधून 25 कोटी रुपयांचे हेरोईन जप्त, एकाला अटक

Rohan_P

पदवी भाडय़ाने देऊन डॉक्टर मध्यप्रदेशात

Patil_p

”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी”

triratna

पीएम केअर फंडाचे ऑडिट होणार

datta jadhav

दुसऱया टप्प्यातील अनलॉकचा निर्णय दोन दिवसांत

Patil_p

व्हिएतनाम भारताचा महत्त्वपूर्ण भागीदार

Patil_p
error: Content is protected !!