तरुण भारत

मुलांचे लसीकरण पुढील महिन्यापासून

12-18 वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना लस – कॅडिलाची जायकोव-डी होणार लाँच

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

Advertisements

कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या भीतीदरम्यान देशात 12-18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. कॅडिला हेल्थकेर पुढील महिन्यात मुलांची लस जायकोव-डी लाँच करणार असल्याचे समजते. याच्या आपत्कालीन वापरासाठी ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) मागील महिन्यातच मंजुरी दिली होती. जायडस कॅडिला ऑक्टोबरपासून दर महिन्याला 1 कोटी डोसचे उत्पादन सुरू करणार आहे.

दुसरीकडे भारत बायोटेकने देखील मुलांवरील कोव्हॅक्सिनचे तिसऱया टप्प्यातील परीक्षण पूर्ण केले आहे. पुढील आठवडय़ात तिसऱया टप्प्यातील परीक्षणाचा डाटा डीजीसीआयला सोपविणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या तिसऱया टप्प्यातील परीक्षणाच्या डाटाचे विश्लेषण केले जात आहे. तर सीरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडिया देखील 2-12 या वयोगटातील मुलांवर कोवाव्हॅक्सचे दुसऱया टप्प्यातील परीक्षण करत आहे.

प्रारंभी 12 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या तसेच गंभीर आजार असलेल्या मुलांचे लसीकरण करण्यात यावे असा सल्ला तज्ञांच्या समितीने सरकारला दिला आहे. देशात 40 कोटी मुले असून सर्वांचे लसीकरण सुरू केल्यास पूर्वीच सुरू असलेल्या प्रौढांच्या लसीकरणावर प्रभाव पडणार असल्याचे समितीचे म्हणणे होते. पूर्णपणे तंदुरुस्त मुलांच्या लसीकरणासाठी अद्याप प्रतीक्षा केली जावी असे समितीचे अध्यक्ष एन. के. अरोडा यांनी म्हटले होते. समितीच्या सल्ल्यानुसार किडनी प्रत्यारोपण, जन्मापासून कर्करोग किंवा हृदयसंबंधी विकार असलेल्या मुलांचे लसीकरण केले जाऊ शकते.

Related Stories

भारतात 12,881 नवे कोरोनाबाधित; 101 मृत्यू

Rohan_P

देशात 1.36 लाख ॲक्टिव्ह रुग्ण

datta jadhav

फ्रान्स संरक्षणमंत्री भारत दौऱयावर येणार

Patil_p

चेन्नईत वृद्धाची इच्छा डॉक्टराने केली पूर्ण

Patil_p

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संमेलनाला प्रारंभ

Patil_p

डेल्टा प्लसवरही कोव्हॅक्सिन प्रभावी

Patil_p
error: Content is protected !!