तरुण भारत

केकेआरविरुद्ध आज रोहित खेळण्याचे संकेत

सलामी लढतीतील अपयश खोडून काढण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज

अबु धाबी / वृत्तसंस्था

Advertisements

आयपीएल स्पर्धेत आज (गुरुवार दि. 23) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध  रोहित शर्मा खेळणे जवळपास निश्चित असल्याने मुंबई इंडियन्ससाठी ही जमेची बाजू असणार आहे. यापूर्वी रविवारी दुसऱया टप्प्यातील सलामी लढतीत मुंबईला चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध 20 धावांनी पराभव पत्करावा लागला, त्यावेळी रोहित शर्मा व हार्दिक पंडय़ा खेळू शकले नव्हते.

मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने रोहित शर्मा पूर्ण तंदुरुस्त असून केकेआरविरुद्ध संघनिवडीसाठी उपलब्ध असल्याचे यावेळी सांगितले. दुसरीकडे, केकेआरने आपल्या सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा तब्बल 9 गडी राखून धुव्वा उडवला.

मुंबईचा संघ बुधवारच्या लढतीपूर्वी गुणतालिकेत 8 गुणांसह चौथ्या स्थानी होता. येथे पहिल्या 4 संघांमधील स्थान कायम राखण्यासाठी त्यांना विजय संपादन करणे क्रमप्राप्त असेल. उत्तम बहरात असलेल्या रोहित शर्माने आपला धडाकेबाज फॉर्म येथेही कायम राखणे अपेक्षित असेल. चेन्नईविरुद्ध मुंबई इंडियन्सला 156 धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले, त्यावेळी नाबाद अर्धशतकवीर सौरभ तिवारीचा अपवाद वगळता अन्य एकही फलंदाज उत्तम प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करु शकला नाही.

केकेआरची उत्तम सुरुवात

यंदा पहिल्या टप्प्यात केकेआरचा संघ बराच झगडत राहिला होता. येथे मात्र आरसीबीला पराभवाचा धक्का देताना त्यांनी तिन्ही आघाडय़ांवर दमदार खेळ साकारला. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील केकेआरचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी असून मागील लढतीत गूढ फिरकीपटू वरुण चक्रवर्ती, स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल यांनी गोलंदाजीत तर सलामीवीर शुभमन गिल, पदार्पणवीर वेंकटेश अय्यर यांनी फलंदाजीत धडाकेबाज योगदान दिले होते. गिल व अय्यरच्या फटकेबाजीमुळे केकेआरने आरसीबीचे 93 धावांचे आव्हान 10 षटकांचा खेळ बाकी राखतच पार केले होते.

कर्णधार मॉर्गनने दुसऱया टप्प्यात केकेआरकडे गमावण्यासारखे काहीच नसल्याने प्रत्येक सामन्यात आपला संघ तुटून पडेल, असे स्पष्ट केले आहे. आरसीबीचा एकतर्फी धुव्वा उडवला, तोच कित्ता यापुढेही गिरवला तर त्यात आश्चर्याचे कारण नाही, असे तो म्हणाला. 2014 मध्ये केकेआरने सलग 9 सामने जिंकत आयपीएल जेतेपद संपादन केले होते, त्याचीच पुनरावृत्ती यंदाही करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ

कोलकाता नाईट रायडर्स ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकिरत सिंग मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंग, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, पवन नेगी, एम. प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम दुबे, टीम साऊदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शकीब अल हसन, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, शेल्डॉन जॅक्सन, टीम सेफर्ट.

मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक, इशान किशन, सुर्यकुमार यादव, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, जेम्स नीशम, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, मार्को जान्सन, युधवीर सिंग, ऍडम मिल्ने, धवल कुलकर्णी, जसप्रित बुमराह, मोहसिन खान, नॅथन काऊल्टर-नाईल, पियुष चावला, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट.

सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.

कोट्स

रोहित शर्मा येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळण्यासाठी उपलब्ध असेल. तो पूर्ण तंदुरुस्त आहे. तो संघात परतल्याने ही अर्थातच आमच्यासाठी जमेची बाजू असणार आहे.

-मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने

Related Stories

माजी पाक कर्णधार इंझमाम-उल-हकवर अँजिओप्लॅस्टी

Patil_p

ब्राझीलची व्हेनेझुएलावर मात

Patil_p

टीम साऊदी, सोफी डिव्हाइन यांचा गौरव

Patil_p

दुसऱया कसोटीत भारताची विजयाकडे वाटचाल

Patil_p

बीएफआयचे ईडी आर. के. सचेती यांचे निधन

Patil_p

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत डीआरएसचे पदार्पण

Patil_p
error: Content is protected !!