तरुण भारत

कोन्टाची दोन स्पर्धांतून माघार

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटनच्या जोहाना कोन्टाने शिकागो व इंडियन वेल्स येथे होणाऱया डब्ल्यूटीए स्पर्धांतून माघार घेतली आहे. धोंडशिरेच्या दुखापतीमुळे तिने हा निर्णय घेतला आहे. याच कारणासाठी तिने अमेरिकन ओपनमध्येही भाग घेतला नव्हता, असे ब्रिटिश मीडियाने वृत्त दिले आहे.

Advertisements

गेल्या जूनमध्येही विम्बल्डन सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच कोन्टाने त्यातून माघार घेतली होती. पण त्यावेळी तिच्या घरातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तो निर्णय घेतला होता. पुढे तिला स्वतालाच कोरोनाची लागण झाल्याने तिची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा हुकली होती. गेल्या महिन्यात तिने सिनसिनॅटीमधील स्पर्धेत शेवटचा सामना खेळला होता. त्या स्पर्धेत तिला पहिल्याच फेरीत झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाने हरविले होते. शिकागोतील स्पर्धा पुढील आठवडय़ात आणि त्यापुढील आठवडय़ात इंडियन वेल्समधील स्पर्धा होणार आहे.

Related Stories

आशिया चषक स्पर्धा आयोजनाचा निर्णय स्थगित

Patil_p

कसोटी मानांकनात रोहित शर्मा आठव्या स्थानी

Patil_p

स्टोक्सने पटकावले अष्टपैलूचे अग्रस्थान

Patil_p

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध मुंबई इंडियन्सचे पारडे जड

Patil_p

टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत बाबर आझम अग्रस्थानी

Patil_p

पाकिस्तान सुरक्षित देशांपैकी एक : गेल

Patil_p
error: Content is protected !!