तरुण भारत

दापोलीत खवले मांजरांच्या खवल्यांची तस्करी

वार्ताहर/ टाळसुरे

दापोली शहरात खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांवर सापळा रचून दापोली पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकाच्या मुसक्या आवळण्यात दापोली पोलिसांना यश आले. तर दुसरा पोलिसांच्या तावडीतून पळण्यात यशस्वी झाला.

Advertisements

  या प्रकरणी बळीराम उतेकर (42, रा. नागाव फौजदारवाडी तालुका महाड, जिल्हा रायगड) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर दुसरा तुकाराम शिंदे (रा. नेरूळनगर खैरोली, तालुका रोहा-जिल्हा रायगड)हा फरार आहे. या बाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास काही लोकं खवले मांजराची खवले विक्रीसाठी दापोलीत येणार असल्याची माहिती दापोली पोलिसांना समजली होती. त्या माहितीनुसार दापोली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल संदीप गुजर, कॉन्स्टेबल सुशिल मोहिते, गायकवाड आदी कर्मचाऱयांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. खवले मांजराची खवले विक्री करणारे दापोली शहरातील इंडियन पेट्रोल पंपासमोर चहाच्या टपरीमध्ये येऊन व्यवहार करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. दुपारच्या सुमारास बळीराम उतेकर व तुकाराम शिंदे हे आपल्या ताब्यातील युनिकॉन मोटारसायकल एमएच 06 बी. आर. 3418 ही गाडी घेऊन पेट्रोल पंपासमोर आले. त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. यावेळी तुकाराम शिंदे हा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यास यशस्वी ठरला. तर दापोली पोलिसांनी बळीराम उतेकर या इसमाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यात असणारे एका मौल्यवान किंमतीच्या मौल्यवान बॅगसह त्यात असणारे सुमारे 4.700 किलो ग्रॅम वजनाचे खवल्या मांजरांचे खवले दापोली पोलिसांनी हस्तगत केले. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चे कलम 39 44 ,48, 51(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

  या प्रकरणाची खबर दापोली पोलीस स्थानकात पोलीस कॉन्स्टेबल सुशिल मोहिते यांनी दिली. दापोली पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे रायगड जिल्हा व रत्नागिरी जिल्हा यांच्यामध्ये खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी चालत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा मुख्य आरोपी कोण आहे, ही खवले खरेदी करण्यासाठी कोण आले होते, या खवल्यांचा पुढील प्रवास कसा होता, आदी प्रश्न उलगडण्याचे आवाहन दापोली पोलिसांसमोर उभे आहे. यातील फरार आरोपी याचा ठावठिकाणा शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दापोली पोलीस स्थानकात प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून रूजू झाल्यानंतर नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलीच धडक कारवाई झाल्याने ढेरे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.

 दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी बळीराम उतेकर याला न्यायालयासमोर हजर केले असता 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विलास पडय़ाळ करीत आहेत.

Related Stories

जिल्हय़ात दिवसभरात पंधराजण मृत्युमुखी

NIKHIL_N

सव्वादोन वर्षांनी सापडली तिवरे धरण दुर्घटनेत वाहून गेलेली चांदीची मूर्ती

Patil_p

जिल्हय़ाला पावसाने झोडपले

NIKHIL_N

रत्नागिरीत ‘या’ ठिकाणी उभा राहणार अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प

Abhijeet Shinde

वेंगुर्ल्यात अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन

NIKHIL_N

‘वादळग्रस्तां’ना जास्तीत जास्त मदत!

NIKHIL_N
error: Content is protected !!