तरुण भारत

जिल्ह्यात २६ सप्टेंबरपर्यंत मुसळधार

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

Advertisements

गेल्या 2 दिवसांपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस मंगळवारपासून जिल्ह्य़ात जोरदार बॅटींग करत आहे. बुधवारीही जिल्हाभरात धुवाँधार पाऊस बरसत राहिला. अजूनही आज 23 सप्टेंबर रोजी जिह्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस तर 24  ते 26 सप्टेंबर या कालावधीत जिल्हय़ात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  बुधवारी पहाटेपासूनच जिल्हाभरात दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेक भागात या पावसाने जनजीवनावर परिणाम झालेला दिसत आहे. नद्या-नाले पुन्हा दुथडी भरून वाहू लागले आहेत. यादिवशी सकाळपर्यंत झालेल्या 24 तासात सरासरी 56.57 मिमि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

खेडमध्ये दुसऱया दिवशीही संततधार

खेडः मंगळवारपासून कोसळणाऱया पावसाचा जोर दुसऱया दिवशी कायमच होता. बुधवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा जनजीवन विस्कळीत झाले. धो-धो कोसळणाऱया पावसामुळे जगबुडी व नारंगी नदी पुन्हा दुथडय़ा भरून वाहत होत्या. पावसाच्या संततधारेमुळे महामार्गावरून धावणाऱया वाहनांचा वेगही मंदावला होता.

दापोलीत पावसाचा जोर कायम 

मौजे दापोलीः गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली आहे. मात्र हा जोर कायम ठेवल्याने शेतकरी, हॉटेल व्यावसायिक चिंतेत आहे. भातशेती दाणेदार झाली आहे. त्यामुळे या शेतीसाठी जोरदार पाऊस धोकादायक ठरत असल्याने शेतकरीवर्ग चिंता व्यक्त करत आहे. जोरदार पावसामुळे शेतीसह इतर कामे करण्यात अडथळे येत आहेत. सोमवारपासून पडणाऱया पावसामुळे कोणत्याही आपत्तीची नोंद दापोली तहसील कार्यालयात करण्यात आलेली नाही.

Related Stories

मालवणात शिवसेनेतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

NIKHIL_N

कोरोनाचे काम न करण्याचे मंत्र्यांनाही मान्य

Patil_p

अवकाळी पावसाचा सागरी कासव प्रजननाला फटका

Patil_p

नदीत पोहायला गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू

Patil_p

होळी’साठी वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर

Patil_p

राष्ट्रीय कुटुंब अनुदान योजनेमधील दारीद्रय रेषेखालीची अट रद्द करावी

NIKHIL_N
error: Content is protected !!