तरुण भारत

अ.भा. मास्टर्स रेंकींग बॅटमिंटन स्पर्धेचा दुसरा टप्पा आजपासून

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

अखिल भारतीय मास्टर्स राष्ट्रीय रेंकींग बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱया टप्प्याला आज 23 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. नावेलीतील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये या स्पर्धेचे आयोजन गोवा बॅडमिंटन संघटनेने अखिल भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या अधिपत्याखाली केले आहे.

Advertisements

23 ते 26 सप्टेंबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन होणार असून यात देशभरातून 1000 हून अधिक प्रवेशिका आल्या आहेत. स्पेनमध्ये होणाऱया विश्वचषक सीनियर बॅडमिंटन स्पर्धेत या स्पर्धेतील कामगिरीवरून भारतीय संघ निवडण्यात येईल.

स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघातून खेळलेले माजी आंतरराष्ट्रीय तसेच प्रसिद्ध बॅडमिंटनपटू या स्पर्धेत भाग घेतील. यात श्रीकांत बक्षी, अमरीश शिंदे, अजय भागवत, किरण माकोडे, विक्रम भासिन, एस. बानू, विजय लॅन्सी, विद्याधर, जॉय अँथनी आणि शालिनी शेट्टी यांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त गोव्याची 40 वर्षांवरील दुहेरीतील जोडी संदीप आणि कमलेश कांझी यांना स्पर्धेत अव्वल मानांकन लाभले आहे. या शिवाय गेल्या मास्टर्स स्पर्धेत तिहेरी जेतेपद मिळविलेली संध्या मेलाशिम्मी, अमित कक्कर आणि विशाल वेर्णेकर तसेच पराग चौहान, डर्वीन बार्रेटो, किशोर रघुबंस, वामन फळारी, विल्पेड जॅक्स, सी. के. शमशुद्दीन आणि सी. के. अयुब यांच्याकडून गोव्याला चांगल्या कामगिरींची अपेक्षा आहे.

पहिल्या टप्प्यात 55 ते 75 वर्षांवरील गटात शानदार कामगिरी केलेले बॅडमिंटनपटूः माया चावत (3 सुवर्ण), मोहम्मद अली बेग (2 सुवर्ण), ऑल्गा डिकॉस्ता (2 सुवर्ण), बीना शेट्टी (2 सुवर्ण), गीता नेगी (2 सुवर्ण, 1 रौप्य), डॉ. सतीश कुडचडकर (1 सुवर्ण, 2 रौप्य), डॉ. सिक्लेटिका रिबेलो (2 सुवर्ण, 1 कास्य), पर्पेच्युआ जॅक्स (1 सुवर्ण, 1 रौप्य), भारती हेबळे व सुरेश प्रभू वेळगेकर (प्रत्येकी एक कास्य).

Related Stories

गोवा माईल्स, ऍप टॅक्सी परवानगी त्वरीत रद्द करा

Patil_p

पैसेअभावी कॅनेडीयन नागरिक कांदोळीत अडकून राहिला

Omkar B

बार्देशाला मुसळधार पावसाने झोडपले

Amit Kulkarni

माशेल जत्रोत्सवाच्या फेरीत घुसले पाणी

Patil_p

धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न सुटणार

Amit Kulkarni

गोव्यात 2022 मध्ये काँग्रेसचे राज्य यावे ही गोमंतकीयांची इच्छा

Patil_p
error: Content is protected !!