तरुण भारत

विजय सरदेसाई यांची काँग्रेसवर पुन्हा तोफ

घटनस्थापेनला घेणार मोठा निर्णय, प्रशांत किशोर यांच्याशी झाली चर्चा,.भाजप विरोधी आघाडीला काँग्रेसने लावला सुरुंग

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

काँग्रेसने गोवा फॉरवर्डबरोबर आघाडी करण्यास आपण सध्यातरी इच्छुक नसल्याचे निवेदन केल्यानंतर संतप्त गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर तोफ डागली आहे. मागील आठवडय़ात आपण प्रशांत किशोर यांना भेटलेलो आहे. तृणमूल बरोबर आघाडी करण्यास आपल्याला रस नाही. परंतु भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांना एका झेंडय़ाखाली आणण्याच्या प्रयत्नास काँग्रेस पक्षाचे नेते सुरूंग लावित आहेत. अशा परिस्थितीत सत्तेवर येण्याचे काँग्रेसचे स्वप्नही पूर्ण होणार नाही. आपले पुढील पाऊल नेमके काय आहे, ते आता घटस्थापनेलाच कळणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.

विजय सरदेसाई यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना काँग्रेस नेत्यांचे वागणे बरोबर नाही. जनतेच्या स्वप्नांचा चुराडा ते करीत आहेत. भाजप विरोधातील वातावरणाचा लाभ काँग्रेस पक्ष उठवू इच्छीत नाही. यामुळे काँग्रेस नेत्यांच्या वागण्यावर आता आपल्याला संशय येऊ लागला आहे. मी काही नवा आमदार नाही. गेली 10 वर्षे आपण या विधानसभेत आमदार आहे. 10 वर्षे येत्या मार्चमध्ये पूर्ण होतील. आपला काँग्रेसशी गेल्या 20 वर्षांचा अनुभव आहे. पी. चिदंबरम सारखे ज्येष्ठ नेते जेव्हा सध्या आम्हाला कोणाशी आघाडी करायची नाही, असे जेव्हा निवेदन करतात याचा अर्थ काय ?

गोव्याची जनता पाहतेय तुम्हाला

राज्यातील जनतेला भाजपचे राज्य जाऊन त्या ऐवजी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आगामी सरकार स्थापन करावे, असा हेतू आहे. जनतेच्या स्वप्नांचा चुराडा कॉंग्रेस पक्ष करीत आहे. त्या पलीकडे जाऊन या पक्षाचे नेते भाजप विरोधात जात नाहीत. याचा अर्थ जनतेला समजलेला आहे. राज्यातील जनता तुम्हाला पाहतेय हे लक्षात ठेवा, असे विजय सरदेसाई म्हणाले. काँग्रेसने युती करायची नाही, असे ठरविले यात आम्हाला दुःख वाटत नाही. गोमंतकीय जनतेची हा पक्ष फसवणूक करतोय. भाजप विरोधी शक्तींना एकत्र करण्याची हिंमत या पक्षात नाही.

होय आपण प्रशांत किशोरना भेटलोय…

विजय सरदेसाई म्हणाले की, आपण देशातले नामवंत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना गोव्यात भेटलोय व त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर गोव्यातील काही राजकीय नेतेही त्यांना भेटलेत. नेमके कोण भेटलेत हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. तत्पूर्वी आपण राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनाही भेटलेलो आहे. आपण काहीही लापवून ठेवणार नाही. परंतु एक गोष्ट खरी की काँग्रेसला त्यांचा निर्णय अडचणीत आणणार. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांबरोबर काँग्रेसमधील काही नेत्यांनी अलीकडे चर्चा केलेली आहे. आपल्याला त्या पक्षाबरोबर जाण्यास रस नाही.

आणि विजय भडकले, आपण घटस्थापनेला चमत्कार घडविणार

काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, काँग्रेसने विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्डला काँग्रेसमध्ये विलीन होण्यास सांगितले आहे. याबाबत विचारले असता विजय सरदेसाई कमालिचे भडकले. कोण हे सांगतो ? सांगा. आपण 10 वर्षे आमदार आहे. आपण एवढय़ा पातळीवर कधीच येणारा नाही. आम्ही संघर्ष करून जिंकलेलो आहोत व जिंकणार आहोत. काँग्रेसची आम्हाला गरज राहिलेली नाही. आम्ही गोंयकार जनतेबरोबर आहोत आणि माझ्या आमदारांना घेऊन जाण्याचे स्वप्न साकार होणार नाही. मला धमकी देऊ पहाता ? भाजपने धमक्या देऊन पाहिले, पर्रीकरांनीही पाहिले. आपण कोणालाच घाबरलो नाही. सध्या महालायांचे दिवस आहेत. ते संपुष्टात आल्यानंतर विजय सरदेसाई काय आहेत, गोवा फॉरवर्ड काय आहे. हे काँग्रेसने पहातच रहावे, असे विजय सरदेसाई म्हणाले. घटनस्थापेनला आमच्या धमक्या पहा. असा गर्भित इशाराच त्यानी काँग्रेस पक्षाला दिला.

आम आदमीला गोव्यात आणण्यास काँग्रेसच जबाबदार

आम आदमी पक्ष गोव्यात का आला, काँग्रेसच्या वृत्तीमुळे व काँग्रेसच्या धोरणामुळेच गोव्यात आम आदमी पक्ष पोहोचलेला आहे. आज आम आदमी पक्ष गोव्यात पाय मजबूत करून आहे. त्याला काँग्रेस पक्षच जबाबदार आहे. आपसुकच या पक्षाला गोव्यात संधी मिळतेय. आपण स्वतः केजरीवालांशी बोललेलो नाही. आम आदमीशीही चर्चा केलेली नाही. दिल्लीचा पक्ष इथे रुजायला काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला.

Related Stories

शैलेश शेट्टी याला 5 दिवसाची पोलीस कोठडी

Omkar B

गोवा शॉपिंग फेस्टिव्हल फोंडा येथे

Amit Kulkarni

राज्यात येणाऱया पर्यटकांना कोविडच्या दोन्ही चाचण्या सक्तीच्या

Amit Kulkarni

कुंकळ्ळी पालिकेच्या पहिल्या बैठकीत उद्यान डागडुजीवरून गरमागरम चर्चा

Amit Kulkarni

कडधान्याचे 374 ट्रक गोव्यात दाखल : मुख्यमंत्री

Patil_p

वामन प्रभू यांना पत्रकार गो मं लाड स्मृती पुरस्कार

Patil_p
error: Content is protected !!