तरुण भारत

शेतकऱयांचा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

कोगनोळीनजीक महामार्गावर आंदोलन :पोलिसांची मध्यस्ती : उड्डाण पुलाला विरोध

वार्ताहर /कोगनोळी

Advertisements

येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे रस्ता रुंदीकरण होणार आहे. त्याचबरोबर कोगनोळी फाटय़ावर उड्डाणपूल होणार आहे. या उड्डाणपूलामध्ये शेतकऱयांची सुपीक जमीन जाणार आहे. शेतकऱयांनी उड्डाणपूल व अतिरिक्त जमीन संपादनाला विरोध दर्शविला आहे. या मागणीचे निवेदन बेळगावचे जिल्हाधिकारी यांच्यासह वरि÷ अधिकारी यांना दिले आहे.

सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून येथील जमिनीचा सर्व्हे करण्याचे काम सुरु झाल्याने आक्रमक झालेल्या रयत संघटनेच्या शेतकऱयांनी याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी यांनी संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना बोलावून घेऊन शेतकरी व अधिकारी यांची बैठक घेतली.

या बैठकीमध्ये शेतकऱयांचा जोपर्यंत निर्णय होत नाही. तोपर्यंत सर्व्हे बंद करण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी उपस्थित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी वरि÷ांशी बोलून याठिकाणी सुरु असलेले सर्व्हे बंद करु, असे आश्वासन दिले. यावेळी शेतकऱयांनी जोरदार घोषणाबाजी केली.

चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी, रस्ता रुंदीकरणाच्या विषयावर शेतकऱयांचे होणारे नुकसान याविषयी माहिती दिली. येणाऱया काळामध्ये शेतकऱयांना सोडून कोणताही निर्णय घेऊ नये अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात येईल असा इशाराही यावेळी पोवार यांनी दिला.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बेळगाव कार्यालयाचे व्यवस्थापक एस.एम.नाईक, कलमेश गुडीमनी, विठ्ठल मोरे यांच्यासह निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार अनिल कुंभार, सहाय्यक फौजदार एस.ए.टोलगी, संजय काडगौडर, राजू गोरखन्नावर, एस.एम.गाडीवड्डर यांच्यासह अन्य पोलीस उपस्थित होते. तसेच शेतकऱयांच्या बैठकीला सुनील माने, संदीप चौगुले, आनंदा पाटील, युवराज माने, बाळासाहेब हादिकर, गब्बर शिरगुप्पे, पुंडलिक माळी, उमेश परीट, नारायण पाटील, मधुकर इंगवले, मन्सूर शेंडूरे, तानाजी जाधव, नागेश पाटील, मुनिर मुल्ला, राजू पाटील, प्रकाश वडर, संतोष चौगुले, विनायक चौगुले, रयत संघटना निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, विवेक जनवाडे, रयत संघटना निपाणी तालुका सेपेटरी कलगोंडा कोटगे, मलगोंडा मिरजे यांच्यासह कारखानदार, व्यावसायिक, कामगार व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

साखर कारखानदारांविरोधात केल्या तक्रारी

Amit Kulkarni

राज्यातील 16.4 टक्के लोकांमध्ये प्रतिजैविके

Omkar B

यश हॉस्पिटलमध्ये कोव्हिडवर मोफत उपचार

Amit Kulkarni

रमेश जारकीहोळी यांना पुन्हा मंत्रिपद द्या

Amit Kulkarni

थंडीत उबदार कपडय़ांना पसंती

Amit Kulkarni

नवरात्रीच्या तयारीला आली गती

Amit Kulkarni
error: Content is protected !!