तरुण भारत

व्हॅक्सिन डेपोत झाडे लावा; मात्र तोडलेल्या झाडांना हात लावायचा नाही!

बेंगळूरच्या चीफ जस्टीसनी स्मार्ट सिटीच्या वकिलांना सुनावले : पुढील सुनावणी 25 ऑक्टोबरला

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

व्हॅक्सिन डेपोतील वृक्षतोडी विरोधात जनहित याचिका बेंगळूर येथील चीफ जस्टीस यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे. त्या ठिकाणी बुधवारी पुन्हा सुनावणी झाली. यावेळी स्मार्ट सिटीच्यावतीने वकिलांनी व्हॅक्सिन डेपोमध्ये झाडे लावण्यासाठी परवानगी मागितली. यावेळी न्यायाधीशांनी जनहित याचिकाकर्त्यांच्या वकिलांना तुमचे म्हणणे काय, असे विचारले असता झाडे लावण्यास आमची काहीही तक्रार नाही. मात्र तेथे कोणत्याही प्रकारच्या झाडाला हात लावू नये, अशी मागणी केली. त्यानुसार न्यायाधीशांनी झाडे लावा, मात्र पडलेल्या झाडालाही हात लावायचा नाही, असे स्मार्ट सिटीच्या वकिलांना सुनावले आहे. याचबरोबर स्थगिती कायम केली आहे.

व्हॅक्सिन डेपोचा विकास साधण्याच्या नावावर तेथील वनस्पती तसेच झाडांची कत्तल सुरू होती. त्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी जोरदार आवाज उठविला. याबाबत बेंगळूरच्या चीफ जस्टीस यांच्याकडे जनहित याचिका दाखल केली. द्विसदस्यीय खंडपीठासमोर याची सुनावणी सुरू आहे. बुधवारी जनहित याचिकाकर्त्यांचे वकील ऍड. सतीश बिरादार आणि ऍड. किरण कुलकर्णी यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली.

यावेळी न्यायाधीशांनी तुमचे म्हणणे सविस्तर ऐकणे गरजेचे आहे. मात्र वेळ कमी आहे. त्यामुळे 25 ऑक्टोबरला पुढील सुनावणी घेतली जाईल, असे सांगितले. यावेळी स्मार्ट सिटीच्यावतीने वकिलांनी आम्हाला त्याठिकाणी झाडे लावण्यासाठी परवानगी हवी आहे, असे म्हणणे मांडले. त्यावर न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा आणि न्यायाधीश सचिन मगदूम यांनी तुम्हाला झाडे लावण्यास परवानगी देवू मात्र कोणतेही विकासकाम त्या ठिकाणी होता कामा नये. यापूर्वी ज्या झाडांची कत्तल झाली आहे. त्या झाडांनादेखील हात लावायचा नाही, असे सुनावले आहे.

पुढील सुनावणीकडे साऱयांचेच लक्ष

याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍड. सतीश बिरादार आणि ऍड. किरण कुलकर्णी यांनी भक्कमपणे आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांना दिलासा मिळाला असून स्थगिती मात्र कायम ठेवली आहे. केवळ वृक्षारोपण करण्यासाठी स्मार्ट सिटीला परवानगी दिली गेली आहे. 25 ऑक्टोबर रोजी होणाऱया पुढील सुनावणीदरम्यान या याचिकेवर वाद व प्रतिवाद होणार आहेत. त्यामुळे आता साऱयांचेच लक्ष त्या सुनावणीकडे लागले आहे.

Related Stories

भिंडे – मळकर्णे येथील जुना पाट कोसळण्याच्या स्थितीत

Omkar B

घरपट्टीवरील 5 टक्के सवलत देण्यासाठी मुदतवाढ

Patil_p

म.ए.समिती कार्यकर्त्यांचा‘तो’ खटला पुन्हा पुढे ढकलला

Amit Kulkarni

मनपा आयुक्तांनी केली लेंडी नाल्याची पाहणी

Patil_p

निपाणीत उद्यापासून सिनेमागृह खुले

Patil_p

महागाईचा भडका, सर्वसामान्यांची होरपळ

Omkar B
error: Content is protected !!