तरुण भारत

किराणा दुकानात दारू विकणाऱया दोघा जणांना अटक : काकती पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

निंग्यानट्टी (ता. बेळगाव) येथील एका किराणा दुकानात बेकायदा दारू विकणाऱया दोघा जणांना काकती पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्यांच्या जवळून दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

Advertisements

काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. किराणा दुकानात बेकायदा दारू विकण्यात येत असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून दोघा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून 14 हजार 860 रुपये किमतीची बेकायदा दारू जप्त करण्यात आली आहे. काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

वडगाव रोडवर खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी

Amit Kulkarni

पोस्टल मतदानासाठी शहरातील 1373 वृद्धांची नोंदणी

Amit Kulkarni

ग्रामीण भागात अघोषित वीजकपात

Amit Kulkarni

हासन बटाटा भाव वधारला

Amit Kulkarni

बांधकाम परवाना अर्ज वेळेत निकालात काढा

Omkar B

राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

Patil_p
error: Content is protected !!