तरुण भारत

कर्नाटकात मागील २४ तासात ९४६ रुग्ण कोरोनामुक्त, तर २० मृत्यू

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये बुधवारी ८४७ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. याचवेळी ९४६ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर मागील २४ तासात राज्यात २० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २९,७०,२०८ वर पोहोचली आहे. यापैकी २९,१८,८९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ३७,६६८ रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. राज्यात २२ सप्टेंबरपर्यंत एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या १३,६२१ इतकी आहे. राज्यात बुधवारी दिवसासाठी सकारात्मकता दर ०.५७ टक्के होता, तर केस मृत्यू दर २.३६ टक्के होता.

मंबुधवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात ३१२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच इतर जिल्ह्यत दक्षिण कन्नडमध्ये १०८ नवीन रुग्ण आणि ५ जणांचा मृत्यू. म्हैसूर जिल्ह्यात ७४ नवीन रुग्ण, शिवमोगा ५२, उडुपी ४८ आणि हसन ४६ प्रकरणे आढळली आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण ४,६६,३३,६७० नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, ज्यात बुधवारच्या १,४६,७७२ चाचण्यांचा समावेश आहे. तर बुधवारी राज्याने १० लाख जणांचे लसीकरण करण्यात आले. बुधवारी राज्यात १०,०६,७६७ डोस देण्यात आले. तर आता पर्यंत एकूण ५,३६,८०,४०१ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. .

Advertisements

Related Stories

बेंगळूर: विरोध असूनही एमबीबीएस आणि दंत परीक्षा होणार

triratna

दहावी परीक्षेला गतवर्षीपेक्षा यंदा उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni

टूलकिट प्रकरण: दिशा रवीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

triratna

रमेश जारकिहोळी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

triratna

कर्नाटक: लग्नाची सभागृहे बुकिंगसाठी शासकीय परवानगी आवश्यक; गाव मेळाव्यांवर बंदी

triratna

कर्नाटक कॅशलेस उपचारात देशात दुसऱ्या स्थानी

triratna
error: Content is protected !!