तरुण भारत

उजनी धरण ८३ टक्के

बेंबळे/ प्रतिनिधी

सोलापूर जिह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण 83 टक्के भरले आहे. गतवषी या दिनी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत होते, परंतु यंदाच्या हंगामात वरुणराजाने पाणलोट क्षेत्राकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाच्या हंगामातील अखेरच्या महिन्यात सुद्धा शंभरी गाठण्यासाठी संघर्ष होताना दिसतो आहे. सद्यःस्थितीला उजनी पाणलोट क्षेत्रातील 19 धरणांपैकी 11 धरणे 100 टक्के भरली आहेत. तर विसापूर वगळता बाकी अन्य धरणांचासुद्धा पाणीसाठा समाधानकारक आहे.

Advertisements

मागील दहा दिवसांत भीमा खोऱयात पावसाने पुनरागमन केल्यामुळे मंदावलेल्या दौंड विसर्गात वाढ होत गेल्या दहा दिवसांत 19 टक्के पाणी वाढले आहे. रविवारी  उजनीत 65.30 टक्के इतका उपयुक्त साठा होता. बंडगार्डन, दौंडमधून मोठÎा
प्रमाणावरील विसर्गामुळे हा 19 टक्क्मयांचा लाभ होत 83.30 टक्के झाला आहे. सद्यःस्थितीला पाणलोट क्षेत्रातील डिंभे 5,240 क्मयुसेक, कळमोडी 311 क्मयुसेक, आंध्रा 183 क्मयुसेक, पवना 2,100 क्मयुसेक मुळशी 1,800 क्मयुसेक या  19 पैकी पाच धरणांमधून नदीपात्रात विसर्ग सुरू असल्यामुळे बंडगार्डन येथील विसर्ग वाढला आहे. बंडगार्डन येथून 10,391 क्मयुसेकची आवक सुरू असल्यामुळे दौंड येथून उजनीत 2,999 क्मयुसेक आवक आहे.

धरणात सध्या 108 टीएमसी पाणीसाठा असून, यातील 44 टक्के पाणीसाठा उपयुक्त पातळीत आहे. उजनी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी 27 टक्के पाण्याची म्हणजेच 15 टीएमसी पाण्याची गरज आहे. उजनीवरील सर्व धरणे 100 टक्के भरली असून, उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी भीमा खोऱयातील पावसाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

बार्शीत व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचण्यासाठी पालिकेचे पथक

triratna

सोलापूर शहरात कोरोनाने एकाचा मृत्यू, 20 नवे रुग्ण

triratna

सोलापूर : डान्सबारवर छापा, बार मालकासह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

triratna

सोलापूर : पंढरपुरातील शेतकऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शोले स्टाईलने आंदोलन

triratna

सोलापूर शहरात तब्बल 106 कोरोना पॉझिटीव्ह, 4 जणांचा मृत्यू

triratna

विक्रम भावेच्या जामिनावर 21 जानेवारीला निकाल

prashant_c
error: Content is protected !!