तरुण भारत

ज्येष्ठांच्या आरोग्यसाठी ‘शरद शतम्’ योजना

मंत्री धनंजय मुंडे : ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण, आरोग्य तपासणी तसेच अभिसरण करण्याची कार्यपद्धती होणार निश्चित

मुंबई/प्रतिनिधी

राज्यातील 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी करणे, त्यांना `शरद शतम्’ आरोग्य कवच विमा योजना लागू करणे या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या महत्वाकांक्षी योजनेला कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल, एनयुएचएमचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, डी एम ई आरचे उपसंचालक डॉ. अजय चांदनवाले, जे जे रुग्णालयातील डॉ. विनायक सावर्डेकर, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, ग्रामविकास विभागातील आस्थापना उपसचिव, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे आस्थापना उपसचिव हे या समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांकरिता आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय चाचण्यांबाबत शिफारशी करणे, या योजनेंतर्गत आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करणेबाबतच्या कार्यपद्धतीबाबत शिफारस करणे, या योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याबाबतचा अहवाल संबंधित ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त होण्याबाबत व त्यात आजार आढळल्यास त्याचे निदान करणेबाबत तसेच आरोग्य विभागाच्या व इतर योजनेमध्ये अभिसरण करण्याची कार्यपद्धतीबाबत शिफारस करणे, इत्यादी बाबींसह शरद् शतम योजनेच्या एकूणच कार्यपद्धतीला निश्चित करण्यासाठी शिफारशी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या समितीवर नेमली आहे. समितीने ठराविक वेळेत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी दिले आहेत.

Related Stories

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनीच मागितला जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रवासाचा परवाना

triratna

सातारच्या चित्रकाराची अनोखी बुद्ध जयंती

triratna

राज्यातील दोन कोटी गरिबांना आर्थिक मदत करा : जनता दल

datta jadhav

सातारा : मराठा आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवलतीस पात्र नसल्याचे परिपत्रक सरकारने रद्द करावे

triratna

“विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न केला, तर शिवसैनिक जिथल्या तिथे हिशोब करतात”

triratna

दिवाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश

Patil_p
error: Content is protected !!