तरुण भारत

“आता माझा एककलमी कार्यक्रम…”, मुंबै बँक चौकशी प्रकरणी दरेकरांचा इशारा

मुंबई/प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या मुंबै बँक कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश सहकार विभागाने दिले असून येत्या ३ महिन्यांत हा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे. तसेच, पुणे जिल्हा सहकारी बँक आणि राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेवर देखील घोटाळ्याचे आरोप त्यांनी केले आहेत. परंतु मुंबै बँक कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिल्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई बँकेचे संचालक प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दरेकरांनी राज्य सरकारवर टीका करताना “बरबटलेल्या हातांनी चौकशी काय करणार? राज्य सहकारी बँकेची अर्धवट चौकशी पुन्हा सुरू करा. मी पत्र देणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाघोटाळा आहे. त्यांची खरेदी बघा. १५-२० कोटींचं सॉफ्टवेअर १५० कोटींना घेतलंय. राज्यातल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांची रीतसर तक्रार आम्ही करणार आणि घोटाळ्याच्या महाराष्ट्रातल्या महामेरूंना उघड करणार. प्रविण दरेकरचा एककलमी कार्यक्रम आता सहकारातले घोटाळे बाहेर काढणं हा आहे”, असं दरेकर यावेळी म्हणाले.

Advertisements

Related Stories

पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी, 177 प्रवासी मुंबईतून रांचीला रवाना

Rohan_P

अभिनेता संदीप नाहरने केली आत्महत्या

Rohan_P

शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ….

triratna

मान्सून ३ जूनला केरळात होणार दाखल

triratna

दुचाकी अपघातात बालिका ठार

Patil_p

आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या

Patil_p
error: Content is protected !!