तरुण भारत

सतत मास्क वापरताय

कोविडपासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. परंतु बराच काळ मास्क वापरल्याने मास्क माऊथ नावाची स्थिती निर्माण होऊ शकते.

  • तज्ञांच्या मते सर्जिकल मास्क हे एन-95 प्रमाणे ‘सफोकेट’ करत नाहीत. तरीही डेन्टिस्ट हे‘ मास्क माउथ’विरोधात खबरदारी घेण्याचा सल्ला देतात.
  • मास्क माऊथ’मध्ये तोंड कोरडे पडणे, श्वासातील दुर्गंधी, दातांतील किड एवढेच नाही तर हिरडय़ांच्या आजारांचा देखील समावेश राहू शकतो.
  • मास्क घातल्याने आपल्या श्वासावर सखोल परिणाम होऊ शकतो. मास्क घातल्यावर आपण डायाफ्रामऐवजी तोंड, छाती आणि मानेचा उपयोग करून वेगाने श्वास घेतो. तोंडावाटे श्वास घेतल्याने लाळेचे प्रमाण कमी होते. ही लाळ ओरल हायजिनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
  • मास्क घातल्याने नेहमीपेक्षा कमी पाणी प्यायले जाते. त्यामुळे तोंड कोरडे पडते. परिणामी दात किडण्याचा आणि श्वासात दुर्गंधीपणा येण्याचा धोका वाढतो.
  • एरोसोल आणि एअर क्वालिटी संशोधनानुसार, आपण जेव्हा मास्क घालतो तेव्हा सामान्यांपेक्षा अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साइड हे आपल्या तोंडात राहते. अर्थात कार्बन डायऑक्साइडचे हे प्रमाण आपल्या शरीरावर दुष्परिणाम करत नाही. परंतु  ओरल मायक्रोबायोमची पातळी वाढवते. त्यामुळे इन्फेक्शन आणि हिरडय़ांचे आजार, सूज यासारखी जोखीम वाढू शकते.
  • मास्क माऊथ’पासून वाचण्यासाठी आपल्याला काही खबरदारी घ्यावी लागणार आहे.
  • मौखिक आरोग्य राखण्यासाठी दोनदा ब्रश करणे, जीभेची स्वच्छता, माऊथवॉशचा वापर आणि हिरडय़ांना मसाज गरजेचा आहे.

Related Stories

ई व्हिटॅमिन कशासाठी ?

Omkar B

शून्य मुद्रा

Omkar B

एन्डोस्कोपीच्या अंतरंगात….

Omkar B

सोफ्यावर जोपताय

Amit Kulkarni

धोका फुप्फुसच्या कर्करोगाचा

Omkar B

झोप कमी, माधुमेहाची हमी !

Omkar B
error: Content is protected !!