तरुण भारत

लाहानबाळांचा पचनसमस्या

लहान बाळांचे संगोपन करताना बहुतेकदा महिला घाबरलेल्या असतात. विशेषतः बाळ जेव्हा उलटय़ा करु लागते तेव्हा आया अधिक घाबरतात. एका मर्यादेपर्यंत लहान मुले उलटय़ा करतातच. पण हे प्रमाण खूप अधिक असेल तर काही गोष्टीत सुधारणा करणे गरजेचे ठरते.

  • बाळांना खाऊ घालताना बाळाचे डोके पोटापेक्षा अधिक उंच असले पाहिजे. त्यामुळे दूध बाळाच्या पोटात जाते आणि पोटातील हवा बाहेर पडण्यास वाव मिळतो. बाळाला कुशीत घेतानाही डोके थोडे उंचीवर असेल अशा प्रकारे घ्या. मानेला आधार देण्यासाठी मऊ उशी वापरा.
  • बाळाच्या पोटाला बेंबीभोवती बेबी ऑईलने मालिश केल्यासही पचनासंबंधी समस्या कमी होऊ शकतात. 
  • दूध प्यायल्यानंतर बाळाने ढेकर द्यायला हवी. त्यामुळे पचन समस्या रोखण्यास मदत मिळते. हवा बाहेर पडल्याने गॅस थांबवता येतो तसेच बाळाला दूध बाहेर काढण्यापासून रोखते. काही मिनिटे वाट पाहिल्यानंतर बाळाला खाऊ घालावे. मग बाळाला खांद्यावर घ्यावे आणि हळूहळू त्याच्या पाठीवर थाप मारल्यासारखे करावे. जेणेकरून त्याला ढेकर येतो.
  • खाल्ल्यानंतर बाळाला पचन समस्या भेडसावत असतील तर मुलांना अतिरिक्त खाद्यपदार्थ किंवा पेय देऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने स्तनपान करत रहावे.
  • बाळाला काहीही खाऊ घालण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. शिवाय बाळाच्या आहारातून स्तनपान एकदमच बंद करू नये. जेव्हा बाळाची वाढ योग्य असेल आणि इतर जेवणाचे पदार्थ खाण्यास सक्षम ते असेल तेव्हाच बाळाचे स्तनपान कमी करावे.
  • बाळाला पोटाशी निगडीत काही समस्या जाणवत असतील तर त्याला वैद्यांच्या सल्ल्याने द्राक्षाचा रस, ग्राईप वॉटर, कार्मिसाईडस्सारखे औषध द्यावे. पाच मिनिटात याचा परिणाम दिसून येतो. ह्या उपायाने बाळ काही काळ शांत होते.

– डॉ. मनोज शिंगाडे

Advertisements

Related Stories

डोळे का फडफडतात

Amit Kulkarni

फायदे चक्रासनाचे

tarunbharat

पतंजली आज लाँच करणार कोरोनावरील औषध

datta jadhav

धोका ‘ब्लॅक फंगस’चा

Omkar B

स्वच्छता थर्मामीटरची

Amit Kulkarni

ट्रान्सफॅटचा धोका

Amit Kulkarni
error: Content is protected !!