तरुण भारत

संपूर्ण भारतच प्रदूषित, WHO ने जाहीर केली वायू प्रदूषणाबाबत नवीन गुणवत्ता पातळी

नवी दिल्ली/प्रतिनिधी

WHO ने वायू प्रदूषणाचे जाहिर केलेले नवीन स्तर लक्षात घेता जवळपास संपुर्ण भारत हा हवेच्या प्रदूषणाने प्रदूषित असल्याचे गृहित धरावं लागणार आहे अशी परिस्थिती सध्या आहे. WHO ने वायू प्रदूषणाबाबत नवीन स्तर, नवीन गुणवत्ता पातळी जाहिर केली आहे. WHO ने प्रदूषकांच्या आकडेवारीचा नवा स्तर हा आरोग्यासाठी गृहित धरावा असे सांगितलं आहे. याआधी WHO ने २००५ मध्ये वायू प्रदूषणाबाबतचे विविध स्तर निश्चित केले आले होते. आता १६ वर्षानंतर WHO ने हवेतील गुणवत्तेबाबत, प्रदूषणाबाबत नवीन स्तर जाहिर केले आहेत.

सुरुवातीला PM 2.5 (particulate matter) या प्रदुषकाचा हवेतील मधील एका क्बुविक मीटरमागे २५ मायक्रोग्रॅम्स हा स्तर सुरक्षित समजला जायचा. परंतु आता बदललेल्या स्तरानुसार १५ मायक्रोग्रॅम्स हा स्तर सुद्धा सुरक्षित नसल्याचं WHO ने सांगितलं आहे. वायू प्रदूषणामध्ये जी सहा सर्वसाधारण प्रदूषके ही गृहित धरली जातात त्या सर्वांचा हवेतील गुणवत्ता स्तर हा बदलवण्यात आला आहे. PM2.5, PM10, ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यांच्या हवेतील गुणवत्ता स्तरामध्ये बदल करण्यात आले आहेत.

Advertisements

दरम्यान दक्षिण आशियातील भारतासारखे देश खास करुन दिल्लीसारखी शहरे ही वायू प्रदूषणाच्याबाबतीत गंभीर पातळीवर आहेत. प्रदूषणाच्या नवीन स्तरानुसार PM 2.5 हे प्रदूषक हे दिल्लीसारख्या शहरात तब्बल १७ पट जास्त आहे. मुंबईत वायू प्रदूषण नव्या स्तरानुसार ९ पटीने जास्त, कोलकाता शहरात ८ पटीने तर चेन्नई शहरात ५ पटीने जास्त ठरणार आहे.

एकीकडे WHO ने २००५ ला जागतिक पातळीवर हवेतील प्रदूषणाबाबत स्तर ठरवला असताना भारतानेही स्वतः देशातील हवेतील प्रदूषणबाबत स्तर निश्चित केला होता, जो WHO च्या तुलनेत कितीतरी शिथील असल्याची टीका अनेकदा अभ्यासकांनी केली आहे. WHO ने ठरवलेले स्तर हे देशांवर बंधनकारक नाहीत, ते मानवी आरोग्याकरता जाहिर करण्यात आले आहेत. तेव्हा उद्योग, पर्यटन व्यवसायाला फटका बसू नये यासाठी अनेक देश सोईनुसार स्वतःचे वायू प्रदूषणाबाबतचे स्तर जाहिर करत आले आहेत. यामुळेच WHO म्हणण्यानुसार जगातील अनेक देशांत वायू प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर आहे आणि आता जाहिर केलेल्या नव्या स्तरानुसार ती आणखी गंभीर पातळीच्या पलिकडे गेली आहे.

Related Stories

उच्च न्यायालयावर निवडणूक आयोग नाराज

Patil_p

अदर पूनावाला धमकी प्रकरणावर संजय राऊत म्हणाले…

Abhijeet Shinde

चीनच्या Weibo, Baidu Search अ‍ॅपवरही भारताने घातली बंदी

datta jadhav

मुंबईसह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी

Rohan_P

ब्लॅक फंगसवरील इंजेक्शन मिळणार 1,200 रुपयात

Amit Kulkarni

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते डीआरडीओ केंद्रांची पायाभरणी

Sumit Tambekar
error: Content is protected !!