तरुण भारत

”भाजप कार्यालयात महिलेवर अत्याचार, आवाज दाबण्यासाठी पीडितेवर मारहाणीचा आरोप”

ऑनलाईन टीम / नवी मुंबई

मुंबईतील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच युवतीचा लैंगिक छळ करण्यात आला असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बोरिवली येथील कार्यालयातच युवतीचा छळ झाल्याचे एएनआयच्या वृत्तानुसार समोर आले आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरुन काँग्रेस, शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पीडितेतला न्याय मिळवून देण्याऐवजी तीचा आवाज दाबण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

अनेक प्रकरणात भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोपाची मालिकाच सुरु केली आहे. ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्यापर्यंत ही मालिका पोहोचली आहे. या निमित्ताने भाजपला आता खरे खोटे करण्यासाठी स्पष्टीकरण देणे आवश्यक ठरणार आहे. तसेच भाजपचे आयते कोलीत विरोधी पक्षांच्या हातात सापडल्यानंतर यावर विरोधी पक्षनेते भाजपला पुरेपुर घेराव घालण्याचा प्रयत्न करतील हे मात्र निश्चित.

भाजपाचे नेते महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीस सरकारच्या काळातच महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले होते. दुसरीकडे देशपातळीवर भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. आत्ताची घटना त्यापेक्षाही गंभीर आहे. भाजपाच्या महिला नेत्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात आणि दुसरीकडे त्यांच्या कार्यालयात विनयभंग होतो ही गंभीर बाब आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या महिलेने खासदार गोपाळ शेट्टी व आमदार सुनील राणे यांना पत्र लिहून मदत मागितली. मात्र त्यांनी न्याय दिला नाहीच उलट तेथील भाजपा नगरसेविकांनी महिलेला मारहाण केली” असं सचिन सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Advertisements

Related Stories

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुणे नॉलेज क्लस्टर व आयुका यांच्यासोबत सामंजस्य करार

Rohan_P

फुटिरवाद रोखण्यासाठी फ्रान्समध्ये कायदा

Patil_p

चार घरफोडय़ा करणाऱयांच्या मुसक्या आवळल्या

Patil_p

दूध संघासमोरील रस्त्यावर चालता डंपर पेटला

Patil_p

‘बायजूस’ने थांबवल्या शाहरुखच्या जाहिराती

Patil_p

काश्मीरमध्ये हिमस्खलन, तीन जवान शहीद, एक बेपत्ता

prashant_c
error: Content is protected !!