तरुण भारत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध रस्ते कामांचा लोकार्पण समारंभ

सांगली जिल्ह्यातील अनेक विकास कामांचा समावेश

प्रतिनिधी / सांगली

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध रस्ते कामांचा कोनशीला अनावरण व लोकार्पण समारंभ येत्या, शनिवार, 25 सष्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता राष्ट्रीय महामार्ग 48, हॉटेल द फर्न, कराड, जि. सातारा येथे होणार आहे. या कार्यक्रमास विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सहकार व पणन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर चे कार्यकारी अभियंता स. वि. सांगावकर यांनी दिली.

तसेच या कार्यक्रमास अतिथी म्हणून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास व कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ, गृह (शहरे) राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार मोहनराव कदम, आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अरूण लाड, आमदार जयंत आसगांवकर, आमदार शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात एकत्रित 5 हजार 971 कोटी रूपयांच्या 403.17 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या रस्ते कामांचा कोनशीला अनावरण व लोकार्पण समारंभ होणार आहे.

Advertisements

Related Stories

म्हैसाळ – कागवाड राज्यमार्ग वाहतुकीसाठी खुला

Abhijeet Shinde

सांगली जिल्हय़ात 272 मुक्त तर नवे 131 रूग्ण

Abhijeet Shinde

कामगाराने उद्योजकाला घातला २० लाखाला गंडा: कुपवाड एमआयडीसीतील प्रकार

Abhijeet Shinde

सांगली : तासगाव धामणी येथील वृद्धेच्या खूनाचा उलगडा

Abhijeet Shinde

सांगली : कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी कडक धोरण राबवा : पालकमंत्री पाटील

Abhijeet Shinde

जिल्ह्यात आणखी नवे १५ रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!