तरुण भारत

जिल्हय़ात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट

सात रुग्ण पॉझिटिव्ह

बेळगाव : बेळगाव शहर व जिल्हय़ातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. गुरुवारी संपूर्ण जिल्हय़ात केवळ सात नवे रुग्ण आढळून आले आहेत तर सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.

Advertisements

सध्या 228 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. अथणी, बेळगाव, चिकोडी, खानापूर, रायबाग तालुक्मयात प्रत्येकी एक तर हुक्केरी तालुक्मयात दोन रुग्ण आढळून आले आहेत. बैलहोंगल, गोकाक, रामदुर्ग, सौंदत्ती तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही.

अद्याप 3 हजार 781 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत जिल्हय़ातील 13 लाख 41 हजार 155 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 12 लाख 52 हजार 909 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रुग्णसंख्येत घट होत चालल्यामुळे आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.

Related Stories

दिल्ली अभी दूर नही…

Amit Kulkarni

संगीत कलाकार संघातर्फे उद्या संगीत मैफल

Amit Kulkarni

तरुणाने मोडले तब्बल 72 वेळा वाहतूकीचे नियम

Patil_p

आरपीडी रोडशेजारील उघडे चेंबर पादचाऱयांसाठी धोकादायक

Amit Kulkarni

अंगणवाडी शिक्षिका-मदतनीसांचे वेतन वाढवा

Amit Kulkarni

दांडेली वन्यजीवी विभाग कार्यालयासमोर निदर्शने

Omkar B
error: Content is protected !!