तरुण भारत

पक्षीय पातळीवर नव्याने जोडण्या !

त्रिसदस्यी प्रभाग रचनाचे परिणाम, निर्णयाबाबत पक्षीय पातळीवर मतमत्तांर, -काहींकडून स्वागत, काहींचा नाराजीचा सूर

विनोद सावंत/कोल्हापूर

Advertisements

महाविकास आघाडी सरकारने महापालिका निवडणूकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा घेतलेल्या निर्णयामुळे पक्षीय पातळीवर नव्याने जोडण्या करण्याची वेळ आली आहे. या निर्णयाबाबत पक्षीय पातळीवर मतमत्तांर आहेत. काहींकडून निर्णयाचे स्वागत तर काहींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

महाविकास आघाडी सरकारने कोल्हापूर महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील राजकीय पक्षांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. एक प्रभाग गृहीत धरून पक्षांनी `एकला चलो रे’चा नारा दिला होता. आता तीन सदस्यीय पद्धतीने पक्षीय पातळीवर आघाडी होणार की स्वतंत्र लढणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे इच्छुकांमध्येही घालमेल सुरू आहे. महाविकास आघाडी एकत्र लढल्यास बंडखोरीचाही धोक आहे.

हद्दवाढीनंतर बदल करणे योग्य ठरले असते
हद्दवाढीनंतर त्रिसदस्यीय प्रभाग रचना केली असती तर प्रभागाची संख्याही वाढली असती. सध्या 81 प्रभागानुसार त्रिसदस्यीय प्रभाग होणार आहेत. त्यामुळे सिंगल प्रभाग रचना योग्य होती. सध्याच स्थितीमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग रचना आवश्यता नव्हती.
आर.के. पोवार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

भाजपच्या निर्णयाचा महाविकास आघाडीकडून कित्ता
बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय प्रथम भाजपने घेतला होता. महाविकास आघाडीकडून भाजपच्या निर्णयाचा कित्ता गिरवला आहे. या निर्णयामुळे पक्षीय नेतृत्वाला संधी मिळेल. पक्षीय निवडणूक होऊन शहराचा सर्वांगिन विकास होईल.
राहूल चिकोडे, जिल्हाध्यक्ष, भाजप

शिवसेनेसाठी निर्णय फायदाचा
त्रिसदस्यीय प्रभागामुळे उमेदवारांचा कस लागणार आहे. सिंगल प्रभागवेळी काहीजण गट्टा मतदान आणि आर्थिक खेळी करून विजयी होत होते. आता असे होणार नाही. आता ज्याचा संपर्क आणि काम असेल त्यांनाच संधी मिळेल. हा निर्णय नक्कीच शिवसेनसाठी फायदाचा ठरणार आहे.
राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

टक्केवारीला खतपाणी घालणारा निर्णय
एक प्रभागात एक नगरसेवक होते. आता त्रिसदस्यीयमुळे घर एक आणि मालक तीन असे होणार आहे. महापालिकेतील विकासकामांतील टक्केवारीला खतपाणी घालणारा निर्णय आहे. सामान्य नागरिक निवडणूकीत उभा राहू शकणार नाही. प्रस्थापितांचा हा डाव असून घराणेशाही सोडून दुसरे कोणीही त्यांना सत्तेत नको असल्याचे यावरून स्पष्ट होते.
संदीप देसाई, अध्यक्ष आप, पश्चिम महाराष्ट्र,

सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय
महाविकास आघाडीचे सोयीचे राजकारण दिसून येते. त्यांनी जनतेला काय पाहिजे. फिल्डवर काम करणाऱयांच्या अडचणी काय आहेत या जाणून घेतलेला नाही. या निर्णयामुळे उमेदवारांच्या खर्चात वाढ होणार असून सामान्य कार्यकर्ता कधीही नगरसेवक होणार नाही.
सत्यजित कदम, गटनेता, ताराराणी आघाडी

काम, संपर्क असणारे निवडून येतील

महाविकास आघाडीच्या निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे नगरसेवकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. मतदारांसमोरही उमेदवार निवडण्यासाठी चॉईस राहणार आहे यामधून चांगले काम करणारे तसेच संपर्क असणारे चांगले उमेदवार निवडून येतील.
आमदार चंद्रकांत जाधव

पैशाची धुळधान थांबणार
त्रिसदस्यी प्रभाग रचनेमुळे अपक्षांची निवडणूक राहणार नाही. पक्षीय पातळीवर निवडणूक होणार असल्याने उमेदवारांची संख्या कमी होणार आहे. पक्षांना अच्छेदिन येतील. याचबरोबर उमेदवारांचा खर्च कमी होणार असून पैशाची धुळधान थांबणार आहे.
विजय करजगार, जिल्हाध्यक्ष, मनसे परिवहन सेना

Related Stories

कसबा बावड्यात डेंग्यू, चिकनगुणियाचे सर्व्हेक्षण

Abhijeet Shinde

हातकलंगले तालुक्यात ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्त्या

Abhijeet Shinde

आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी रद्द

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणावर घटनापीठ देणार फैसला

Abhijeet Shinde

साहेब पैसे आमच्याच हातात पडूदेत…

Abhijeet Shinde

माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी उद्या कोल्हापुरात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!