तरुण भारत

‘ऑन दी स्पॉट’ लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद

चार दिवसांत केवळ 2857 जणांनी घेतली लस

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

महापालिकेने 18 वर्षावरील नागरिकांसाठी `ऑन दी स्पॉट’ विशेष लसीकरण मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. या गटात तब्बल 2 लाख नागरिकांनी लस घेतलेली नाही. असे असताना चार दिवसांत विशेष लसीकरण केवळ 2 हजार 857 नागरिकांनी या माध्यमातून लस घेतली आहे. आज, शुक्रवारी मोहिमेचा अंतिम दिवस आहे.

तिसऱया लाटेचा धोका वर्तवला जात असल्याने महापालिकेने लसीकरण मोहिम गतीने होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या 15 दिवसांत पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध असूनही नागरिक लसीकरणासाठी येत नाहीत. 18 ते 44 वर्षातील लसीकरणाचे प्रमाण केवळ 17 टक्केच झाले आहे. त्यांचे लसीकरण होण्यासाठी ऑनलाईन बुकींग ऐवजी ऑन दि स्पॉट लस देण्याचा विशेष लसीकरण शिबिर सुरू केले. 20 ते 24 असे पाच दिवस विशेष लसीकरण माहिम आहे. यामध्ये पहिल्या दिवशी 2739, दुसऱ्या दिवशी 65, तिसऱया दिवशी 9 तर चौथ्या दिवशी 54 नागरिकांचे लसीकरण झाले.

दिवसभरात 3087 जणांना लस
शहरात गुरुवारी 3 हजार 87 नागरीकांना कोव्हिशिल्डची लस देण्यात आली. लसीकरण करण्यात आले. यामध्ये 18 ते 45 वर्षापर्यंत 2 हजार 344 तर 45 ते 60 वर्षापर्यंत 513 नागरीकांचा समावेश आहे. तसेच 18 वर्षावरील विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत गुरुवारी 54 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्येही 5 नागरीकांना पहिला तर 49 नागरीकांना दुसरा डोस घेतला.

Related Stories

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजानचा रस्ते अपघातात मृत्यू

Rohan_P

एमआयएमची मोठी घोषणा: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत लढविणार १०० जागा

Abhijeet Shinde

ओमिक्रॉनमुळे भारतावर पुन्हा आर्थिक संकट ?

Sumit Tambekar

समांथाने नाकारली 200 कोटींची पोटगी

Patil_p

गांधीनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमावा

Abhijeet Shinde

…तर पुरस्कार परत करेन : कंगना

datta jadhav
error: Content is protected !!