तरुण भारत

लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी 78 टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी 31 टक्के आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा आणि यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

Advertisements

जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांबाबत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील मजूर सकाळी लवकर कामाला जातात. ते लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या मजुरांसाठी सकाळी 7 वाजता लसीकरण सुरु करण्यात यावे. ग्रामीण भागामध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. सध्या लसीचा पुरवठा चांगल्या पद्धतीने होत असून नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करावे याबाबत जनजागृती करावी

यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. दिपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते आदी उपस्थित होते.

Related Stories

पोवईनाक्यावरचा प्रवास ठरतोय जीवघेणा

Amit Kulkarni

रक्तपेढ्यांच्या मनमानीला बसणार चाप

datta jadhav

झोपडपट्टी सुरक्षा दलाकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा

Patil_p

सातारा जिल्ह्यात 157 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 218 नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार करणाऱयांचा गौरव

Patil_p

हद्दवाढ क्षेत्रातील बांधकाम परवान्यात अडचण

datta jadhav
error: Content is protected !!