तरुण भारत

फेसबुकमध्ये होणार क्रांतिकारक परिवर्तन

फेसबुकचे संचालक मार्क झुकरबर्ग यांनी नवी महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. भविष्य काळात फेसबुकमध्ये या योजनेनुसार क्रांतिकारक परिवर्तन होणार आहेत. फेसबुक केवळ सोशल मीडिया कंपनी राहणार नाही तर ती ‘मेटावर्स’ कंपनी होणार आहे. याशिवाय कंपनी एम्बॉयडेट इंटरनेटवर काम करणार आहे. या तंत्रज्ञानातून सत्य आणि आभासी विश्वाचा संगम होणार आहे. फेसबुकच्या सर्व 300 कोटी युजर्सवर या परिवर्तनाचा मोठा परिणाम जाणवणार आहे.

नुकतीच झुकरबर्ग यांनी आपल्या कंपनीच्या ज्येष्ठ कर्मचाऱयांसह बैठक घेऊन चर्चा केली आहे. मेटावर्स तंत्रज्ञानाचे जाणकार आणि क्विन्सलँड विद्यापीठाचे ज्येष्ठ तंत्रज्ञान निक केली यांच्या म्हणण्यानुसार माणसाने ऑडिओ स्पीकरपासून टेलिव्हिजनपर्यंत अनेक वस्तू विकसित केल्या आहेत. या सर्व वस्तूंना आपली इंद्रिये ओळखतात. भविष्यात माणूस स्पर्श आणि गंध आदी अनुभवांच्या आधारावर उपकरणे विकसित करणार आहे. या उपकरणांना मेटावर्स म्हणून ओळखले जाते. मेटावर्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आभासी (व्हर्च्युअल) विश्व आणि भौतिक विश्व (रियल) यांचा संयोग घडविला जातो. मेटावर्स हा शब्द 1992 मध्ये विज्ञान साहित्यिक निल स्टिफन्सन यांनी आपल्या स्नो कॅश या कादंबरीत प्रथम उपयोगात आणला होता. आता हा शब्द सर्वसामान्यांच्या परिचयाचा झाला आहे. याच तंत्रज्ञानाच्या आधारावर फेसबुकमध्ये परिवर्तन होणार आहे.

Advertisements

Related Stories

विमानासारखी दिसणारी हँडबॅग

Patil_p

फ्रान्समध्ये वाहतूक कोंडी

Patil_p

9 वर्षीय मुलाचे दारिद्रय़ाशी बॉक्सिंग

Patil_p

पाकिस्तानमध्ये बुद्धांच्या मूर्तीची विटंबना, तिघांना अटक

datta jadhav

स्थलांतरित कामगारांची काळजी कशी घ्यावी?

Omkar B

कतार कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याच्या तयारीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!