तरुण भारत

हत्तींनी केली जंगी पार्टी

उत्तरप्रदेशातील आग्रा-मथुरा मार्गावर चुरमुरा नामक गावात हत्ती संरक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. येथील हत्ती प्रशिक्षकांनी काही दिवसांपूर्वी हत्तींसाठी विशेष बुफे भोजन आणि पार्टीचे आयोजन केले होते. हत्तींनी या पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला. भरपूर मस्तीही केली. आणि माणसांप्रमाणेच ही पार्टी एंजॉय केली या पार्टीचे व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

नेहमीच्या कार्यक्रमाप्रमाणे या हत्ती संरक्षण केंद्रातील हत्तींनी आपली प्रभातफेरी आटोपल्यानंतर या बुफे पार्टीत भाग घेतला. केंद्रातील कर्मचाऱयांनी हत्तींसाठी हिरवे गवत, मका, टरबूज, केळी, भोपळे आणि पपई आदी पदार्थ ठेवले होते. हा एक अतिभव्य बुफे ठरला. हत्तींनीही अगदी माणसांच्या अविर्भावात या पदार्थांवर ताव मारला. माणसे ज्या प्रमाणे बुफेमध्ये प्रत्येक स्टॉलवर जाऊन तेथील पदार्थ आपल्या ताटात वाढून घेतात त्याचप्रमाणे हत्तींनीही या पदार्थांच्या स्टॉल्सवरती जाऊन त्यांचा आस्वाद घेतला. याशिवाय त्या पार्टीत अनेक प्रकारच्या ताज्या भाज्यांचेही स्टॉल्स होते. इतक्या विभिन्न प्रकारचे भोजन एकाचवेळी या हत्तींनाही कधी मिळाले नव्हते.

Advertisements

हत्ती आपल्यासाठी महत्त्वाचा प्रेरणास्त्रोत आहेत. तेव्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून पकडून त्यांना अन्यत्र नेले जाते. तेव्हा त्यांना फार मोठय़ा मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. नव्या वातावरणाशी जुळवून घेताना त्यांना खूप त्रास होतो. तथापि बहुतेक हत्ती हा बदल कालांतराने स्वीकारतात. आणि कोणतीही खळखळ न करता नवी जीवनशैली आत्मसात करतात. माणसांवरही कित्येकदा आपल्या सवयीच्या प्रदेशातून अन्यत्र स्थायिक होण्याची वेळ येते. तेव्हा त्याने हत्तींचा आदर्श डोळय़ासमोर ठेवावा,असेही तज्ञ म्हणतात.

Related Stories

आंध्रमध्ये देवांच्या मूर्तीची विटंबना सुरूच

Patil_p

तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे अँबेसिडर : ममता बॅनर्जी

prashant_c

शेअर बाजारात 2 हजार अंकांची उसळी

Patil_p

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोळीबारात ५ जणांचा मृत्यू;उड्डाणे रद्द झाल्याने भारतीयही अडकले

triratna

येडियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

triratna

सैनिक मागे घेण्यावर चीनबरोबर चर्चा

Patil_p
error: Content is protected !!