तरुण भारत

कांगडाचा अनुज स्पेस एजन्सीमध्ये संशोधक

हिमाचल प्रदेशातील कांगडा या शैक्षणिकदृष्टय़ा मागास आणि आदिवासी बहुल प्रदेशातील एक तरुण आपल्या कर्तृत्वावर युरोपियन स्पेस एजन्सीचा संशोधक बनला आहे. अनुज चौधरी असे त्याचे नाव असून तो 25 वर्षांचा आहे. संपूर्ण कांगडा प्रदेशातून आतापर्यंतच्या इतिहासात अशी मजल मारणारा तो एकमेव युवक ठरला आहे.

त्याचे शिक्षण कांगडा येथील अत्यंत सुमार दर्जाच्या स्थानिक शाळेत झाले आहे. बराच काळपर्यंत त्याला इंग्रजीचा गंधही नव्हता. असा अनूज जगातील पाचव्या क्रमांकाच्या सर्वात मोठय़ा अंतराळ संशोधन संस्थेत आता संशोधक म्हणून काम करत आहे. त्याला जागतिक संशोधकांच्या परीक्षेत 12 वा क्रमांक मिळाला होता. युरोपियन स्पेस एजन्सीने त्याची विशेष मुलाखतीनंतर निवड केली होती. त्यानंतर त्याचे पुढचे प्रशिक्षण युरोपमधील विविध देशांमध्ये झाले. त्याची गुणवत्ता पाहून त्याला वरिष्ठ संशोधक म्हणून काम देण्यात आले. आता तो या संस्थेच्या माध्यमातून चंद्रावर संशोधन करणार आहे. त्याच्या या यशाबद्दल आईवडील आणि इतर नातेवाईक अत्यंत आनंदीत आहेत.

Advertisements

Related Stories

कोरोनापासून वाचण्यासाठी आदिवासींचा उपाय

Patil_p

‘मन की बात’ मध्ये नद्यांच्या संरक्षणावर भर

Patil_p

काँग्रेस उमेदवाराचा कोरोनामुळे मृत्यू

Amit Kulkarni

पेगॅससवरून पुन्हा संसद ठप्प

Patil_p

होय, चीनने केला आहे कब्जा; राहुल गांधींना लडाखच्या भाजप आमदाराचे उत्तर

Rohan_P

बाधित रुग्ण परिसरातील नागरिकांची चाचणी व्हावी

Patil_p
error: Content is protected !!