तरुण भारत

सारस्वत बँकेच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात 2133 मतदान

प्रतिनिधी / कणकवली:

सारस्वत को. ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी शुक्रवारी मतदान झाले. बँकेच्या संचालक मंडळाच्या या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिह्यात 2133 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात आमदार वैभव नाईक यांनी येथील शाखेत मतदान केले. या बँकेसाठी एकूण 16 जणांचे संचालक मंडळ असून त्यापैकी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित दहा जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. प्रत्येक मतदाराला दहा मतांचा अधिकार होता. त्यानुसार कणकवली शाखा 375, कुडाळ 405, मालवण 450, वेंगुर्ले 450, सावंतवाडी 218, वैभववाडी 72 व देवगड 163 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

रुग्णवाहिकेने बांद्यात येणे पडले महागात

NIKHIL_N

प्रभुंकडून रिफायनरीचे समर्थन

Patil_p

पर्यटन महामंडळ कामांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त

NIKHIL_N

खेडमध्ये पावणे दोन लाखाहून अधिक किंमतीचा गुटखा जप्त

Patil_p

पोल्ट्री अधिकाऱयाने भरले दीड लाख!

Patil_p

धार्मिक स्थळे 7 ऑक्टोबरपासून होणार सुरू

NIKHIL_N
error: Content is protected !!