तरुण भारत

उमरान मलिकचा हैदराबाद संघात समावेश

वृत्तसंस्था/ दुबई

सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया टप्प्यासाठी नवोदित वेगवान गोलंदाज उमरान मलिक याचा काही कालावधीसाठी सनरायजर्स हैदराबाद संघात समावेश करण्यात आला आहे. या संघातील टी.नटराजन कोरोनाबाधित झाल्याने त्याच्याजागी उमरान मलिकला संधी देण्यात आली आहे.

Advertisements

काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणीमध्ये टी. नटराजन पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. बुधवारी हैदराबाद आणि दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी नटराजन कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. 21 वषीय मलिकने आतापर्यंत एकमेव टी-20 सामना खेळला आहे. जम्मू-काश्मीर विरुद्धच्या सामन्यात मलिकने 4 गडी बाद केले होते. सनरायजर्स हैदाबाद संघामध्ये मलिकचा यापूर्वीच समावेश करण्यात आला होता. पण त्याचा वापर केवळ नेटमधील प्रॅक्टीससाठी करण्यात आला होता. 30 वषीय नटराजनला आता दहा दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत 24 सामन्यात 20 गडी बाद केले आहेत.

Related Stories

मुंबई सिटी एफसी खेळाडूंकडून बालदिन साजरा

Patil_p

ब्रिटनच्या डेपरची स्पर्धेतून माघार

Patil_p

विद्यमान विजेत्या तामिळनाडूसमोर कर्नाटकचे तगडे आव्हान

Patil_p

पीसीबीच्या हॉल ऑफ फेमचे उद्घाटन लवकरच

Patil_p

आयर्लंडचा अष्टपैलू केव्हिन ओब्रायन निवृत्त

Patil_p

कसोटी मालिका विजयासाठी सर्वोत्तम कामगिरीची गरज

Omkar B
error: Content is protected !!