तरुण भारत

…रशियाच्या माखोव्हवर चार वर्षांची बंदी

वृत्तसंस्था/ मॉस्को

लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातील 120 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविणारा रशियाचा मल्ल बिलयाल माखोव्ह उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने त्याच्यावर आता चार वर्षांची बंदी घालण्यात आल्याची माहिती रशियाच्या उत्तेजक विरोधी संघटनेने दिली आहे.

Advertisements

माखोव्हच्या बंदी कालावधीला 27 जानेवारी 2020 पासून प्रारंभ करण्यात आला आहे. माखोव्हची मूत्रल चाचणी घेण्यात आली, त्यामध्ये निर्बंध घातलेले उत्तेजक द्रव्य आढळल्याने त्याच्यावर वरील कारवाई तातडीने करण्यात आली. माखोव्हने यापूर्वी तीनवेळा विश्वविजेतेपद मिळविले असून 2012 च्या स्पर्धेमध्ये त्याने कांस्यपदक पटकाविले होते. 2019 साली उत्तेजक चाचणी निर्बंधामुळे रशियाच्या टेमाझोव्ह आणि मॉडमेनसेव्हिली यांना अपात्र ठरविण्यात आले होते.

Related Stories

किंग्स इलेव्हन पंजाबची हैदराबादवर मात

Patil_p

फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांना १९ किलोमीटर धावून वाहिली अनोखी श्रद्धांजली

triratna

भारत-ओमान यांच्यात आज फुटबॉल सामना

Patil_p

अविनाश साबळे युगांडात ट्रेनिंग घेणार

Patil_p

भारतीय क्रिकेट संघ उद्यापासून 14 दिवस क्वारंटाईन

Patil_p

बुमराहच्या विवाह सोहळय़ासाठी फक्त 20 निमंत्रित!

Patil_p
error: Content is protected !!