तरुण भारत

वादग्रस्त दृश्यप्रकरणी कपिल शर्मावर गुन्हा

भोपाळ / वृत्तसंस्था

‘द कपिल शर्मा शो’मध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृश्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा अडचणीत आला आहे. वादग्रस्त दृश्याप्रकरणी त्याच्यावर मध्यप्रदेशमधील शिवपुरी येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये न्यायालयाचा सेट उभारण्यात आला होता. यात कपिल शर्मा हातात दारुचा ग्लास घेऊन आपले पात्र साकारत होता. यामुळे न्यायालयाचा अपमान झाल्याची तक्रार त्याच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील शिवपुरी येथील एका वकिलाने त्याच्याविरोधात सीजीएम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणावर 1 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

Advertisements

Related Stories

बीजिंग ऑलिम्पिकवर बहिष्काराची मागणी

Patil_p

केएसआरटीसी महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी अ‍ॅप विकसित करणार

triratna

अपेक्स प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका

triratna

गोव्यात मंगळवारी कोरोनाचे 136 बाधित

GAURESH SATTARKAR

सिंचन आयोगाच्या चिपळूणच्या शिफारशीबाबत पाठपुरावा करणार

Patil_p

कर्नाटकमधील शाळा, महाविद्यालये ३१जुलैपर्यंत बंद राहणार

triratna
error: Content is protected !!