तरुण भारत

बिहारचा शुभम कुमार युपीएससीमध्ये अव्वल

टॉप टेन’मध्ये 5 मुली, एकूण 761 जणांची निवड, भोपाळमधील जागृती अवस्थी दुसरी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात ‘युपीएससी’ मंडळाने नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. या परीक्षेत बिहारचा शुभम कुमार (रोल नंबर 1519294) अव्वल आला. भोपाळमध्ये शिकलेल्या जागृती अवस्थीला द्वितीय तर अंकिता जैनला तिसरा क्रमांक मिळाला. पहिल्या 25 मध्ये 13 पुरुष आणि 12 महिला आहेत. त्याचबरोबर 5 महिलांनी ‘टॉप टेन’मध्ये स्थान मिळवले आहे. 2015 मधील बॅचची टॉपर टीना डाबीची धाकटी बहीण रिया डाबीने यावेळी 15 वा रँक मिळवला आहे. एकूण परीक्षार्थींपैकी 761 जणांना नियुक्त्या दिल्या आहेत.

युपीएससीमध्ये देशात पहिला आलेल्या शुभम कुमारने आयआयटी बॉम्बेमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आहे. तर जागृतीने भोपाळच्या मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रकिल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून 263, आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून 86, मागास प्रवर्गातून 229, अनुसूचित जातीतील 122, अनुसूचित जमातीतील 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. एकंदर 761 उमेदवार पात्र ठरले आहेत. याशिवाय 150 उमेदवारांना राखीव ठेवण्यात आले आहे. यावषी 545 पुरुष आणि 216 महिलांनी परीक्षेत बाजी मारली आहे. यावषी एकूण 836 पदांची भरती होणार आहे.

Related Stories

मथुरेत कारला भीषण अपघात; 4 ठार

datta jadhav

भुतानमधील सकतेंग अभयारण्यावर चीनचा दावा

datta jadhav

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त पीएम मोदींचे मराठीतून ट्वीट, म्हणाले…

Abhijeet Shinde

देशातील 32 शेतकरी संघटनांची आज बैठक

datta jadhav

घरचा चहा, प्रसिद्ध ब्रँड्सना टक्कर

Patil_p

नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनेलच्या प्रसारणावर बंदी

datta jadhav
error: Content is protected !!