तरुण भारत

महालसीकरण मोहिमेंतर्गत शहरात 6,200 नागरिक लसवंत

प्रतिनिधी/ सातारा

 कोरोना हद्दपार व्हावा व लसीकरण मोहिम शंभर टक्के पुर्ण व्हावी हा उद्देश समोर ठेऊन शहरात विविध ठिकाणी कोरोना प्रतिबंधक महालसीकरण मोहिम राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सदर मोहिम दि. 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एकुण 6 हजार 200 नागरिकांना लस देण्यात आली.

Advertisements

 यावेळी पहिला व दुसऱया या दोन्ही लसी केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत सलग तीन दिवस ही मोहिम राबविण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सातारा पालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे स्वागत सातारकरांतर्फे करण्यात आले. तसेच मुख्य लसीकरण केंद्रापर्यंत जाणे शक्य नसणाऱया नागरिकांना आपल्या निवासस्थानाजवळच लसीकरणाची सोय उपलब्ध झाल्याने समाधान ही व्यक्त करण्यात येत होते. यावेळी 18 वयोगटापुढील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

Related Stories

फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची : सभापती रेखा घार्गे

triratna

सांगली : कडेगाव येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपाचे आंदोलन

triratna

अखेर केंद्राच्या पथकाने मेडिकल कॉलेजची केली पाहणी

Patil_p

शिये क्रशरविभाग पाच दिवस लॉकडाउन : सरपंच

triratna

सातारा : रुग्णांच्या उपचारासाठी योग्य नियोजन करा – पालकमंत्री

triratna

”केंद्राने राज्यांविरोधात डोकं लावण्यापेक्षा कोरोनाविरुद्धात लावावे”

triratna
error: Content is protected !!