तरुण भारत

चिपळूणच्या प्रथमेश राजेशिर्केचा ‘युपीएससी’त झेंडा!

चिपळूण/ प्रतिनिधी

भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा अशा अनेक देशपातळीवरच्या परीक्षांसाठी अधिकाऱयांची निवड करणाऱया युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील प्रथमेश अरविंद राजेशिर्के हा उत्तीर्ण झाला आहे. जिह्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होणारा बहुधा पहिलाच आहे.

Advertisements

2020 साली युपीएससीकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्य चिपळूण-मांडकीमधील प्रथमेश राजेशिर्के याने पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश मिळवले आहे. प्रथमेशचे पहिले ते दहावीपर्यंतचे शिक्षण डेरवण येथे तर पुढे3 वर्षे सांगली येथील वालचंद कॉलेजमध्ये मेपॅनिकल इंजिनियरिंगचे 4 वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर वर्षेभर नोकरी केली. त्यानंतर युपीएससी शिक्षणासाठी तो दिल्ली येथे गेला. अखिल भारतीय स्तरावरील क्रमयादीत प्रथमेश हा 236 व्या क्रमांकावर आला आहे. प्रथमेशच्या यशाबद्दल मांडकीसह चिपळूणमध्ये त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Related Stories

वेंगुर्ले आगारातून सुटणार दोन गाडय़ा

NIKHIL_N

जिल्हा बँक, जि.प. निवडणूक महाविकास आघाडीमार्फतच

NIKHIL_N

व्हेल, डॉल्फिन, कासव संरक्षणासाठी अमेरिकेचा आग्रह

NIKHIL_N

गुहागमध्ये 26 दुकानातून 1251.80 क्विंटल मोफत धान्य वितरण

Patil_p

रत्नागिरी : घेरासुमारगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी कटिबद्ध

triratna

कोकण किनारपट्टीवर शतकातील सर्वात मोठे चक्रीवादळ धडकणार

Patil_p
error: Content is protected !!