तरुण भारत

लसीकरण होतंय गल्लोगल्ली

अचूक बातमी ”तरुण भारत”ची, शनिवार, 25 सप्टेंबर 2021, सकाळी 10.15

● प्रबोधनावर प्रशासनाने दिला आहे भर
● शाळा, मंदिरांची घंटा लवकरच खणाणार
● बाधितांचा चढउतार सुरूच
● मंत्री घेताहेत कोरोनाचा आढावा
● कोविन पोर्टलमध्ये केला बदल
● सातारा तालुक्यात बाधित वेग मंदावू लागला

Advertisements

सातारा / प्रतिनिधी :

कोरोनाला दूर करायचे तर टुचुक घ्यायचं हे आता सगळ्यांना समजू लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाला वेग आला आहे. शहरात गल्लोगल्ली लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते हे आपल्या वार्डात आपल्या गल्लीत लसीकरण राबवत आहेत. लसीकरण मोहीम आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रबोधन करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यात बाधितांचा चढउतार सुरूच असून 8722 जणांची तपासणी झाली असून नव्याने 184 बाधित वाढले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील शाळांची आणि मंदिराची घंटा लवकरच वाजणार आहे परंतु सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह हे निर्णय घेतील तेव्हा मंदिर आणि शाळा सुरू होणार आहेत. तसेच शासनाने कोव्हिन पोर्टलमध्ये बदल केला आहे.

जिल्ह्यात बाधितांचा चढउतार सुरूच

सातारा जिल्ह्यात बाधितांचा चढ उतार सुरू आहे. चढ उतार सुरू असला तरीही सप्टेंबर महिन्यात नव्याने बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या ही टप्याटप्याने घटताना दिसत आहे. सध्या दररोज बाधित आढळून येणाऱ्याची संख्या ही 200 ते 184 च्या दरम्यान आढळून येत आहेत. तर दररोज होणाऱ्या तपासण्या काहीशा कमी झालेल्या आहेत. काल दिवसभर 8 हजार 722 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. एकूणच जिल्ह्याची कोरोनाची परिस्थिती काहीशी नियंत्रणात येऊ लागली आहे.

मंत्री घेऊ लागलेत कोरोनाचा आढावा

जिल्ह्यात नेमकी परिस्थिती कोरोनाची काय आहे. कुठे उणीव आहे, काय करायला हवं, काय नको, जिल्ह्यातली परिस्थिती आणखी कशी आटोक्यात आणता येईल याच अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे बैठका घेऊन आढावा घेत आहेत. सूचना देत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राजकीय कार्यक्रमाना जोर वाढू लागला असल्याचे चित्र दिसत आहे.

सातारा तालुक्यात बाधित होण्याचा वेग मंदावतोय

जिल्ह्यातील आतापर्यंत 20 लाख 42 हजार 801 जणांची तपासणी झालेली आहे. या तपासणीपैकी आतापर्यंत 2 लाख 47 हजार 516 बाधित तर 2 लाख 37 हजार 901 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यातील 6 हजार 81 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.5 हजार 789 रुग्ण उपचार घेत आहेत. बाधित होणाच्या संख्येत घट होऊ लागल्याने काहीसे जिल्हावासीय सुखावू लागले आहेत. त्यामध्ये सातारा तालुका सुरुवातीपासून कोरोनासाठी प्रथम क्रमांकावर राहिला होता. आता तेच प्रमाण 50 च्या ही आत येऊ लागले आहे. सातारा तालुक्यातील सातारा शहर व उपनगरात कोरोनाची छूट्टी करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. तालुका कसा कोरोना मुक्त होईल यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पवार हे प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यामुळे आणि नागरिक ही स्वतः नियम पाळत असल्याने सातारा तालुक्यातील वेग मंदावत आहे. ही दिलासादायक बाब आहे.

लवकरच मंदिर आणि शाळांची घंटा वाजणार

कोरोनाचे संकट जगावर आले होते. हे जैविक महायुद्धची असल्याची जगात चर्चा सुरू असून त्यात सर्वच भरडले गेले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. त्या लॉकडाऊनमध्ये शाळा, मंदिरे, धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि.7ऑक्टोबर ला मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे. सातारा जिल्ह्यातील 64 टक्के शाळा सुरू करण्याबाबतचा अहवाल गत आठवड्यात शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह हे नेमके कधी नवा शाळा व धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले. तर कोविन पोर्टलमध्ये बदल करण्यात आला आहे.

शनिवारपर्यंत
एकूण नमूने – 20,42,801
एकूण बाधित – 2,47,516
घरी सोडण्यात आलेले – 2,37,901
मृत्यू –6,081
उपचारार्थ रुग्ण– 5,789

Related Stories

बसाप्पा पेठेतील खोदकाम उघडयावर

Patil_p

शशिकांत शिंदेंचा आज उमेदवारी अर्ज दाखल होणार

Patil_p

गोंधळ ‘लॉक’ अन् भीती ‘डाऊन’ करा

datta jadhav

‘ग्रेड सेपरेटर’ चे काम 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण होणार – पालकमंत्री

triratna

सातारा : टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात

datta jadhav

तिजोरीतील खडखडाटाने पालिकेत बचतीचे धोरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!