तरुण भारत

बेदाणे @ ३६५ रुपये प्रतिकिलो

मार्केट यार्डातील सौद्यात हंगामातील दराचा उच्चांक

प्रतिनिधी/सांगली

Advertisements

शुक्रवारी मार्केटयार्डात काढण्यात आलेल्या सौद्यात बेदाण्याला 365 रूपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. कर्नाटकातील शेतकरी महेंद्र पाटील यांच्या बेदाण्याला या हंगामातील आतापर्यंतचा रेकॉर्डब्रेक दर असल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.

बेदाण्याच्या दरात पुन्हा काही दिवसापासून वाढ होत आहे. येथील मार्केट यार्डात शुक्रवारी 25 दुकानात पंचेचाळीस गाडी आवक झाली होती. तुषार शहा यांच्या के. एम. कार्पोरेशनमध्ये कर्नाटकातील महेंद्र पाटील या शेतकऱयाच्या 52 बॉक्सला आतापर्यंतचा उच्चांकी 365 रुपये असा प्रतिकिलो भाव मिळाला. हा बेदाणा गणपती एटरप्राईजेस यांनी खरेदी केला.

सांगलीची बेदाणा बाजारपेठ ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नावारूपाला आलेली  आहे. यार्डात महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यातून प्रचंड मोठÎा प्रमाणात शेतीमाल विक्रीसाठी येतो. शेतकऱयांच्या मालाला व बेदाण्याला खुले सौदे काढून योग्य दर दिला जातो. त्यामुळे शेतकऱयांनी आपला बेदाणा सांगली बाजारपेठेत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती दिनकर पाटील व सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.

बाजारपेठेत बेदाण्याची आवक वाढली असून दरही चांगला टिकून आहे. शेतकऱयांना पेमेंट योग्य वेळेत केले जाते. कोरोना व परदेशातील आवक कमी झाल्याने यावर्षी बेदाण्याचा दरही टिकून असल्याचे बेदाणा व्यापाऱयांनी सांगितले. यावेळी मनोज मालू, प्रशांत मजलेकर, राजू कुंभार, हिरेण  पटेल, नितीन मर्दा, रुपेश पारेख, अश्विन पटेल, सचिन चौगुले, अजित पाटील, विनीत गीडे, गगन अग्रवाल, विनायक हिंगमिरे, वृषभ शेडबाळे, योगेश कबाडे, महेश नागराळ, दिगंबर यादव, कुमार दरुरे आदीसह व्यापारी मोठÎा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

सांगलीवाडी, कृष्णा घाटावर रेस्क्यू टीम तैनात

triratna

सांगली : नववी ते बारावी पर्यंतचे खाजगी शिकवणी वर्ग सुरू करण्यास परवानगी – जिल्हाधिकारी

triratna

सांगली : करंजेत चक्क भर पावसात डांबरीकरण

triratna

सांगली : मद्यधुंद ट्रक चालकाने तरुणाला चिरडले; आटपाडीत तणावाचे वातावरण

triratna

कडेगावच्या प्रभारी प्रांताधिकारीपदी आयुषी सिंह

triratna

सांगली मार्केट यार्डात ११० कोटींची उलाढाल ठप्प!

triratna
error: Content is protected !!